Shocking News: बाल्कनीतून आईला हाक मारत होता चिमुरडा, १८ व्या मजल्यावरून पडून मृत्यू

Little boy Fall From Balcony: आपण काय करतोय हे लहान मुलांना कळत नाही, त्यामुळे पालकांची सतत त्यांच्यावर नजर असणे आवश्यक असते. त्यांच्याकडे थोडा जरी दुर्लक्ष झाला तरी अनर्थ घडू शकतो. एक धक्कादायक प्रकारातून याची प्रचिती तुम्हाला येऊ शकते. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 16, 2023, 10:49 AM IST
Shocking News: बाल्कनीतून आईला हाक मारत होता चिमुरडा, १८ व्या मजल्यावरून पडून मृत्यू title=

Little boy Fall From Balcony: आई वडिलांनी आपल्या लहान मुलांना एकटे सोडून फार दूर जाऊ नये, असे नेहमी सांगितले जाते. आपण काय करतोय हे लहान मुलांना कळत नाही, त्यामुळे पालकांची सतत त्यांच्यावर नजर असणे आवश्यक असते. त्यांच्याकडे थोडा जरी दुर्लक्ष झाला तरी अनर्थ घडू शकतो. एक धक्कादायक प्रकारातून याची प्रचिती तुम्हाला येऊ शकते. 

अनेक इमारतींना खुल्या बाल्कनी असतात. हे लहान मुलांसाठी खूपच धोकादायक ठरते. यातून मोठ्या दुर्घटना समोर येतात. एनसीआरच्या ग्रेटर नोएडामधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे एक 12 वर्षांचा मुलगा एका उंच इमारतीच्या 18 व्या मजल्यावरून पडून मृत्यूमुखी पडला आहे. 

बालकनी खाली उभ्या असलेल्या आईला हाक मारत असतानाच तो अचानक खाली पडला. मुलाच्या कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आश्चर्याची बाब म्हणजे हा अपघात झाला त्यावेळी फ्लॅटमध्ये मुलाची आई किंवा वडील नव्हते.

आईला बघण्याच्या नादात निष्पापाचा जीव गेला

मुलगा आईला बोलवायचा प्रयत्न करत होता. आईला बोलावण्यासाठी त्याने 18व्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली पाहण्याचा प्रयत्न केला आणि तो थेट खाली पडला. त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही. त्याच्या मृत्यूने संपूर्ण घरात एकच खळबळ उडाली असून त्याची आई आक्रोश करत आहे. मुलाच्या अशा अचानक जाण्याचा आईवडिलांनी जबर धसका घेतला आहे. 

असे प्रकार वारंवार घडतात

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलाचे कुटुंब मूळचे मध्य प्रदेशचे असून त्याचे वडील एनसीआरमध्ये एका खासगी कंपनीत काम करतात. नोएडामध्ये उंच इमारतीवरून पडून मुलांचा मृत्यू होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. असे असले तरीही या दु:खद बातम्या रोजच ऐकायला मिळतात. गेल्या महिन्यात नोएडाच्या सेक्टर 78, हायड पार्क सोसायटीच्या 8व्या मजल्यावर बांधलेल्या फ्लॅटच्या बाल्कनीतून पाच वर्षांच्या मुलाचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे पालकांनी मुलांवर सतत लक्ष ठेवणे आवश्यक आहेच. पण सोसायटीने देखील इमारतीचे धोकादायक बांधकाम बदलून घ्यायला हवे.