लागिरं झालं जी! लेफ्ट. निंभोरकर बनले सर्वात जास्त मेडल मिळवणारे फौजी

सेनेच्या मास्टर जनरल ऑफ ऑर्डिनेन्स लेफ्टनंट जनरल राजेंद्र रामराव निंभोरकर यांना परम विशिष्ट सेवा मेडल देऊन सन्मानित करण्यात आलंय. 

Updated: Jan 26, 2018, 04:30 PM IST
लागिरं झालं जी! लेफ्ट. निंभोरकर बनले सर्वात जास्त मेडल मिळवणारे फौजी title=

नवी दिल्ली : सेनेच्या मास्टर जनरल ऑफ ऑर्डिनेन्स लेफ्टनंट जनरल राजेंद्र रामराव निंभोरकर यांना परम विशिष्ट सेवा मेडल देऊन सन्मानित करण्यात आलंय. 

यासोबतच लेफ्ट. निंभोरकर सेनेत सर्वात जास्त वीरता पदक आणि सेवा सन्मान मिळवणारे कार्यरत अधिकारी बनलेत. 

एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, लेफ्ट. निंभोरकर यांना सेवेतील प्रत्येक स्तरावर सन्मान प्राप्त झालाय. ते या अगोदर लडाख, काश्मीर, पुंछ, राजौरी सोबतच वाळवंटी भागातही तैनात राहिलेत.

राजौरीत 'ऑपरेशन विजय' दरम्यान ते गंभीररित्या जखमी झाले होते. यावेळी त्यांना वाऊंड मेडल मिळालं होतं. याशिवाय द्रास सेक्टरमध्ये वीरतेसाठी सेना मेडल, नौशेरामध्ये असताना विशिष्ट सेवा सेना मेडल, अखनूरमध्ये सेवेदरम्यान विशिष्ट सेवा मेडल, नगरोटा मध्ये उत्तम युद्ध सेवा मेडल त्यांनी मिळवलंय. 

दक्षिण काश्मीरच्या अति विशिष्ट सेवा मेडल, मास्टर जनरल ऑफ ऑर्डिनन्ससाठी परम विशिष्ट सेवा मेडलही त्यांनी पटकावलंय.