मुंबई : होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या नव्या 125 सीसीच्या स्कूटर होंडा ग्रेसियाने लाँच होताच अवघ्या अडीच महिन्यात 50 हजाराहून अधिक विक्रीचा आकडा पार केलाय.
कंपनीने गुरुवारी याबाबतची माहिती दिली. ग्रेशिया लाँच झाल्यानंतर ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे सर्वाधिक विक्रीच्या यादीत होंडाने टॉप 10मध्ये जागा मिळवली. होंडाने गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या अखेरीस ग्रेशिया लाँच केली होती.
एचएमएसआयचे वरिष्ठ उपाध्यक्ष यजविंदर सिंह गुलेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेशियाची मॉडर्न स्टाईल, उच्च गुणवत्ता, विश्वास आणि उद्योग जगतात पहिल्यांदाच सादर करण्यात आलेले फीचर्स यामुळे ही स्कूटर इतरांपेक्षा वेगळी ठरली.
ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल यदविंदर म्हणाले, ग्रेशिया येणाऱ्या काळात वेगाने विकसित होत स्कूटर बाजारात होंडाला अव्वल स्थान मिळवून देईल.