Lic च्या 'या' पॉलिसीत 800 रुपयांच्या गुंतवणुकीवर 5 लाखांचा परतावा, इतरही फायदे

या स्कीममध्ये 8 वर्षाच्या बालकांपासून ते 54 वर्षांपर्यंत प्रत्येक जण गुंतवणूक करु शकतो.

Updated: Jun 29, 2021, 06:50 PM IST
Lic च्या 'या' पॉलिसीत 800 रुपयांच्या गुंतवणुकीवर 5 लाखांचा परतावा, इतरही फायदे  title=

मुंबई : एलआयसीची (Lic)  जीवन लाभ पॉलिसी (LIC Jeevan Labh Plan)  गुंतवणूकीसाठी सर्वोत्तम योजना आहे. पॉलिसीधारकाला (Policy Holder) पॉलिसी मॅच्युअर्ड  झाल्यानंतर रग्गड परतावा मिळतो. तसेच अतिरिक्त बोनसही मिळतो. दरमहा फक्त 800 रुपयांच्या गुंतवणूकीवर 5 लाख किंवा त्यापेक्षा अधिकची रक्कम मिळेल. तसेच या स्कीमनुसार डेथ बेनिफिटही क्लेम करु शकतो. (LIC Jeevan Labh Plan invest per month 800 rupees and  take 5 lakh)  
 
एलआयसीच्या या स्कीममध्ये 8 वर्षाच्या बालकांपासून ते 54 वर्षांपर्यंत प्रत्येक जण गुंतवणूक करु शकतो. यामध्ये किमान 2 लाखांचा सम एश्योर्ड मिळतो. तर अधिकाअधिक याबाबतीत कोणतीही मर्यादा नाही.  या पॉलिसीची मर्यादा 3 टप्प्यांमध्ये आहे. यानुसार गूंतवणूकदार 16, 21 आणि 25 वर्षांचा अवधी आहे. यानुसार पॉलिसीधारकाला अनुक्रमे 10, 15 आणि 16 वर्षांपर्यंतच योजनेचा हफ्ता भरावा लागेल. पण स्कीम मॅच्युअर्ड झाल्यानंतरच गुंतवणूकदाराला सर्व रक्कम मिळेल. 

उदाहरण, जर तुम्ही 30 वर्षांचे असल्यास 2 लाखांच्या स्कीममध्ये पैसे गुंतवत असल्यास त्या पॉलिसाचा अवधी हा 25 वर्ष इतका असेल. यासाठी दरमहा तुम्हाला 800 रुपयांचा हफ्ता भरावा लागेल. त्यानुसार तुम्हाला एकूण 1 लाख 50 हजारांचा एकूण हफ्ता भरावा लागेल. तसेच हजार रुपयांमागे पॉलिसीधारकाला  47 रुपयांचा अतिरिक्त बॉनस ही मिळणार आहे. 25 वर्षांनंतर ही बोनस रक्कम तब्बल 2 लाख 35 हजार इतकी होईल. याशिवाय पॉलिसी मॅच्युअर्ड झाल्यानंतर अतिरिक्त बोनस म्हणून 90 हजार मिळतील, कारण एलआयसी यामध्ये प्रति हजार रुपयांवर 450 रुपयांचा बोनस देते. यानुसार पॉलिसीधारकाला 5 लाख 25 हजार इतकी रक्कम मिळेल.    
अतिरिक्त फायदे

पॉलिसीधारकाचा अपघातात दुखापत झाल्यास तसेच अपंगत्व किंवा मृत्यू झाल्यास (Accidental Death and Disability) यानुसार अतिरिक्त फायदे मिळतात.   

संबंधित बातम्या :

हे साधंसुधं क्रेडिट कार्ड नाही, जितके जास्त पैसे खर्च करणार तितके परत मिळणार.... काय आहे योजना?

 

IRCTC च्या वेबसाईटवरुन तिकीट काढताना Aadhaar आणि PAN समोर ठेवा, कारण...