तुमच्या आजूबाजूला खूप बॅक्टेरीया असतात, यांपैकी कोणते good आणि कोणते bad बॅक्टेरीया?

तज्ज्ञांच्या मते काही बॅक्टेरीया असे आहेत जे आपल्या शरीरीचे नुकसान करत नाहीत आणि उलट ते आपल्यासाठी उपयुक्तच असतात.

Updated: Jun 29, 2021, 05:57 PM IST
तुमच्या आजूबाजूला खूप बॅक्टेरीया असतात, यांपैकी कोणते good आणि कोणते bad बॅक्टेरीया? title=

मुंबई : कोणतेही बॅक्टेरीया असो, सर्वसाधाराण सगळेच बॅक्टेरीया आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात असे आपण मानतो. टीबी, टाइफाइड, फूड पॉयजनिंग, मेनिनजाइटिस, टिटनेस, न्यूमोनिया, उपदंश, कॉलरा यासारखे अनेक रोग केवळ बॅक्टेरियाद्वारे पसरतात. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की, खराब बॅक्टेरियाशिवाय असे चांगले बॅक्टेरिया देखील आहेत. जे आपल्या शरीरासाठी चांगले असतात.

हो आपल्या आजूबाजूला चांगले बॅक्टेरीया असतात असे तज्ज्ञ सांगतात. तज्ज्ञांच्या मते काही बॅक्टेरीया असे आहेत जे आपल्या शरीरीचे नुकसान करत नाहीत आणि उलट ते आपल्यासाठी उपयुक्तच असतात.

काही बॅक्टेरीया आपल्या जीवनासाठी खूप महत्वाचे आहेत. कारण ते एंजाइम बनवतात, जे अन्न पचन करण्यास आपल्या शरीराला मदत करतात.

बॅक्टेरिया मानवी शरीरात 'बी' जीवनसत्त्वे आणि 'के' जीवनसत्व  तयार करतात. त्याचप्रमाणे चांगले बॅक्टेरिया हे खराब बॅक्टेरियाविरूद्ध लढतात आणि त्यांना वाढू देत नाहीत. ते आतड्यांमधील अंतर्गत अस्तरांचे संरक्षण करतात आणि संक्रमणापासून आपले संरक्षण करतात.

आपल्या पाचन तंत्रातील बॅक्टेरिया या मोठ्या आतड्यात आणि लहान आतड्याच्या मागच्या भागात आढळतात. पाचक रस आणि सजीवांच्या शरीरात निर्मार्ण होणाऱ्या सूक्ष्मजंतूमुळे आपल्या शरीरातील लहान आतड्याच्या आतील भागात, तसेच पोट आणि पुढच्या भागांमध्ये बॅक्टेरिया आढळत नाहीत.

चांगले बॅक्टेरिया आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवतात. जेव्हा एखाद्या रोगास कारणीभूत ठरणारे कोणतेही बॅक्टेरिया आपल्या संपर्कात येतात तेव्हा हे चांगले बॅक्टेरिया सक्रिय होतात आणि त्याविरूद्ध लढायला आपल्या शरीराला मदत करतात.

आपण दही खातो. दुधाचे दही होण्यानागे बॅक्टेरियाचीच भूमिका असते. लॅक्टोबेसिलस बॅक्टेरिया हे दहीमध्ये आढळतात.

तसेच आपल्या त्वचेवर आढळणारे स्टेफिलोकोकस एपिडर्मिडिस बॅक्टेरिया देखील आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हे इतर बॅक्टेरियांपासून आपल्या त्वचेचे रक्षण करते.

तुम्हाला माहित आहे का? की, आपल्या तोंडात आणि घशातही बॅक्टेरिया नेहमी आढळतात. हे बॅक्टेरीया विरिदंस स्ट्रेप्टो कोकस. हे आपल्या तोंडात आणि घश्यावर हल्ला करणार्‍या बॅक्टेरियापासून आपले संरक्षण करतात.

व्हिनेगर, पनीर, लोणी इत्यादींमध्ये बरेच उपयुक्त  बॅक्टेरिया देखील आपल्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे जर हे चांगले बॅक्टेरिया नसतील तर ते आपल्या आरोग्याला धोकादायक ठरु शकतात.