रमझानमध्ये मतदान वादावर निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया

 निवडणूक आयोगाने सोमवारी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Updated: Mar 11, 2019, 05:10 PM IST
रमझानमध्ये मतदान वादावर निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया  title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक कार्यक्रमास 11 एप्रिलपासून सुरूवात होत आहे. मतदान तारखेच्या दरम्यानच रमजान महिना असल्याने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उलट सुलट प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण निवडणूक आयोगाने सोमवारी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. रमजानचा पूर्ण महिना आम्ही मतदान थांबवू शकत नाही. रमजानचा महत्त्वाचा दिवस आणि शुक्रवार म्हणजे जुम्म्याच्या दिवशी मतदान नसणार आहे. रमझानच्या महिन्यात निवडणुका घेतल्याने तृणमूल कॉंग्रेससहित काही पक्षांनी याला विरोध केला आहे. अल्पसंख्यांकानी मतदान करावे असे भाजपावाला वाटत नाही. म्हणून रमजान असल्याची काळजी घेतली नाही. पण आम्हाला काळजी नाही. आम्ही मतदान करणार असेही ते म्हणाले. 

Image result for election commission zee news

निवडणूक आयोग एक संविधानिक संस्था आहे. आम्ही त्याचा सन्मान करतो. आम्ही त्याच्या विरोधात काही बोलू इच्छित नाही. 7 चरणात होणाऱ्या निवडणुकीत बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालची निवडणूक त्यांच्यासाठी कठीण असणार आहे. या तीन राज्यात अल्पसंख्यांकांची संख्या जास्त आहे. रमजान देखील याचवेळी असल्याने मुस्लिम रोजा ठेवतील. त्यामुळे निवडणूक आयोगाला याची काळजी घ्यावी लागणार आहे. 

Image result for election commission zee news

एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी रमजान वरून राजकारण करणाऱ्यांवर टीका केली आहे. स्वत:च्या फायद्यासाठी मुस्लिम समुदाय आणि रमजानचा वापर करु नका असे आवाहन ओवेसी यांनी केले आहे. तसेच रमजान दरम्यान जरी निवडणुका असल्या तरी मुस्लिम मतदानावर त्याचा काही परिणाम होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.