मुंबई : पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी फक्त २ दिवस उरले आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार ३१ मार्चपर्यंत पॅन आणि आधार लिंक करता येणार आहे. २०१७ मध्ये पॅन आधार लिंक करण्याची प्रक्रिया सुरु झाली. तेव्हापासून अनेकदा ही कालमर्यादा वाढवण्यात आली आहे. आता ३१ एप्रिलपर्यंत मात्र ही डेडलाईन वाढवली जाण्याची शक्यता फारच कमी आहे.
प्रामुख्यानं ज्या एनआरआय लोकांकडे पॅन आहे. पण आधार कार्ड काढणे कायद्यात बसत नाही, अशांसाठी ही प्रक्रिया फारच जिकीरीची होणार आहे. एनआरआय जर भविष्यात भारतात आले आणि त्यांची बँक खाती एनआरओ प्रकारची नसतील, तर त्यांच्या सामान्य खात्यातील रकमांचे व्यवहार ठप्प होतील.
शिवाय भविष्यात त्यांना पॅन काढताना देखील अडचणी येऊ शकतात. सरकारनं याविषयी पावलं उचलणं गरजेचं असल्याचं कर विश्लेषकांचं म्हणणं आहे.
आधार पॅनला एसएमएसद्वारे लिंक करण्यासाठी 567678 किंवा 56161 वर SMS एसएमएस पाठवावा लागेल. याचा एक फॉरमॅट निश्चित केला आहे यूआयडीएपीएन (१२ अंकी-आधार क्रमांक) स्पेस (१० अंकी पॅन नंबर) लिहून एसएमएस SMS करावा. एखाद्याचा आधार कार्ड नंबर ABCD12345678 आहे व पॅन कार्ड क्रमांक XYZ12345645 आहे. तर एसएमएस SMS करताना हा फॉरमॅट "ABCD12345678 WXYZ123456" असा असेल.
किंवा https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar या लिंकवर क्लिक करून आधार पॅनला लिंक करू शकता.
तुम्ही आधार पॅन लिंक केले असेल परंतू तुम्हाला ते लक्षात नसेल तर आयकर विभागाच्या पोर्टलवर जाऊन तुम्ही तपासू शकता. तुम्ही तुमचे आधार पॅन लिंक आहे की नाही. हे पाहण्यासाठी https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/link-aadhaar-status या लिंक वर क्लिक करा आणि चेक करा. त्यानंतर जर तुमचे आधार पॅन लिंक असेल तर तसा संदेश प्राप्त होईल.