Lady Passenger in Flight: नेपाळ विमान दुर्घटनेमध्ये (Nepal Plane Crash) पाच भारतीयांसह 72 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघाताचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असल्याने प्लेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशातच आता एक व्हिडिओ (Flight Video) समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी डोक्याला हात लावलाय. सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओची चर्चा असल्याचं दिसतंय. (lady passenger in spirit airlines says crash and die she removed from flight watch video)
सध्या एका महिलेचा एक व्हिडिओ (Lady Passenger in Flight) समोर आला आहे. ज्यामध्ये सर्व प्रवाशांकडे पाहून महिला ओरडताना दिसत आहे. हे विमान कोसळेल आणि सर्वांचा मृत्यू होईल, अशी भविष्यवाणी महिला करते. यानंतर विमानातील काही कर्मचारी तातडीने महिलेकडे पोहोचले.
आणखी वाचा - Air India जागतिक विक्रमाच्या उंबरठ्यावर...500 विमानांची खरेदी करणार?
अमेरिकेच्या स्पिरिट एअरलाइन्समधील (Spirit Airlines) ही घटना असल्याची माहिती समोर आली आहे. हे उड्डाण होणारच असताना एक महिला प्रवासी मागे बसून सिगारेट ओढत होती, तिला असे करताना पाहून विमान कर्मचाऱ्यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण महिलेना माघार घेतली नाही. यानंतर तिला समजवण्याचा प्रयत्न केला, त्यात महिलेला संताप अनावर झाला.
दरम्यान, फ्लाईटमधील महिला ओरडू लागली आणि हे विमान कोसळेल, सर्वांचा मृत्यू होईल. यानंतर महिलेला खाली उतरवण्यात आलं. कर्मचारी महिलेला बाहेर (Lady Passenger removed from flight) काढत असताना फ्लाइटमध्ये बसलेल्या एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ शूट केला. सध्या हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. महिलेने रागाच्या भरात हे सांगितल्याचं एअरलाईन्सने सांगितलं. विमानात बसलेले सर्व प्रवासी सुखरूप पोहोचल्याची माहिती देखील देण्यात आलीये.