बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की त्यांचं सरकार काँग्रेसच्या आशिर्वादाने आलं आहे. कुमारस्वामी यांनी कर्जमाफीसाठी आयोजित बैठकीत ही गोष्ट बोलून दाखवली. त्यांनी म्हटलं की ते पुन्हा काँग्रेसकडे प्रस्ताव ठेवल्यानंतर या संबंधात निर्णय घेतील. दुसरीकडे शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन देणाऱ्या जेडीएसवर भाजप टीका करत आहे.
कुमारस्वामी यांनी याआधी देखील असंच वक्तव्य केलं होतं तेव्हा त्यांच्यावर टीका झाली होती. नंतर त्यांनी स्पष्ट केलं काँग्रेसच्या समर्थनामुळे त्यांच्या युतीचं सरकार आलं आहे. असं त्यांना म्हणायचं होतं. त्यांना कोणाला दुखवायचं नव्हतं. पण कर्जमाफीबाबत काँग्रेस काहीही बोलत नाही आहे. काँग्रेसकडून या प्रकरणावर उत्साह दिसत नाही आहे. कुमारस्वामी आता त्यांना काँग्रेसला विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
#WATCH: At meeting with farmer leaders, #Karnataka CM HD Kumaraswamy speaks on farmers' loan waiver, says, 'Without the blessing of people, but only with blessing of Rahul Gandhi, we've come to power. I'll convince Congress party, but I can only take decision once they approve.' pic.twitter.com/VQiNuPA9oN
— ANI (@ANI) May 30, 2018
3 तास चाललेल्या शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीत त्यांनी म्हटलं की, "15 दिवसात आम्ही निर्णयावर पोहोचू... या 15 दिवसात याला पूर्णपणे लागू केलं जाईल. कोणत्याही अडचणी आल्या तरी आमचं सरकार शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी प्रतिबद्ध आहे. उपमुख्यमंत्री जी परमेश्वर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा करतील. मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, राहुल गांधी देखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रतिबद्ध आहेत.