कोलकाता : सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. यात सून आपल्या सासूला जबर मारहाण करताना दिसतेय. ७५ वर्षाच्या सासूने न सांगता फूल तोडले म्हणून तिला सून जबर मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसतेय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडिंग होतोय. हे प्रकरण दक्षिण कोलकातामधील बांसद्रोणी भागातील आहे. जेव्हा सून आपल्या सासूला मारहाण करत होती तेव्हा शेजारच्यांनी याचा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.
या व्हिडीओला काही तासांतच ५ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले तर २५ हजाराहून अधिकांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. बंसद्रोनी पोलीस ठाण्यातील एसजीटी शुभ्रा चक्रवर्ती यांनी फेसबुकवर हा व्हिडीओ पाहिला आणि तातडीने तपास सुरु केला. हे फेसबुक अकाऊंट रांतु सेनगुप्ता यांचे होते. त्यांना तातडीने पोलीस ठाण्यात बोलावल्यानंतर घटनेची संपूर्ण माहिती मिळाली. पीडित महिला कोलकात्यामध्ये राहणारी असून जशोदा पॉल असे या महिलेचे नाव आहे. तिला तिची सून स्वप्ना पॉल हीने मारहाण केली होती.