Kolkata Rape Case: धक्कादायक! कोलकाता बलात्कार प्रकरणातील आरोपीचं थेट पोलीस आयुक्तांशी कनेक्शन

Kolkata Doctor Rape Murder Case Update : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीची बाईक पोलिस आयुक्तांच्या (Police Commissioner) नावावर नोंदणीकृत असल्याची माहिती समोर आलीये.

सौरभ तळेकर | Updated: Aug 27, 2024, 07:10 PM IST
Kolkata Rape Case: धक्कादायक! कोलकाता बलात्कार प्रकरणातील आरोपीचं थेट पोलीस आयुक्तांशी कनेक्शन title=
Police Commissioner Sanjay Roy bike

Kolkata Doctor Rape Murder Case : कोलकाता मधील आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये 9 ऑगस्टच्या रात्री 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीच्या दुचाकीची कोलकाता पोलिस आयुक्तांच्या नावावर नोंद आहे. भाजपचे बंगालचे प्रभारी अमित मालवीय यांनी यावर गंभीर आरोप केला होता. त्यावर आता कोलकाता पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

सीबीआयने आरोपी संजयची दुचाकी जप्त केली होती. सीबीआयच्या पथकाने दुचाकी उचलून कार्यालयात आणली होती. त्यानंतर त्याची चौकशी केली गेली. आरोपी संजय याच दुचाकीवरून फिरत असे. घटनेच्या दिवशीही त्याने तीच दुचाकी वापरली आणि घटनेनंतर त्याच दुचाकीवरून परतला होता. मात्र, ही गाडी कोलकाता पोलिसांच्या नावावर नोंदणीकृत असल्याचं समोर आलं होतं. त्यावर कोलकाता पोलिसांनी निवेदन जाहीर केलंय.

कोलकाता पोलिसांचं स्पष्टीकरण

मीडिया रिपोर्ट्स आणि सोशल मीडियावर माहिती समोर येताच कोलकाता पोलिसांनी एक निवेदन जारी केलं. पोलिस आयुक्तांच्या नावावर दुचाकीची नोंदणी झाल्याचं त्यांनी मान्य केलं. मात्र, सर्व सरकारी वाहनांची नोंदणी पोलिस आयुक्तांच्या नावानं करणं ही प्रमाणित पद्धत असल्याचं त्यांनी सांगितलं. कोलकाता पोलिसांच्या सर्व सरकारी वाहनांची नोंदणी पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत केली जाते, असे पोलिसांनी मंगळवारी एका निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, कोलकातामध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलंय. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधातही संतापाची लाट पसरलीय. तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन सुरु केलंय. कोलकातामधील महिला डॉक्टरवर अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर ममता बॅनर्जी सरकार संकटात आलंय.. मंगळवारी कोलकात्यातील विद्यार्थ्यांचं हे आंदोलन दडपण्यासाठी 5 ते 6 हजार पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. आक्रमकपणे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानं पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या.