Reliance Industries Shares: मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज अनेक क्षेत्रात व्यवसाय करतेय. टेलिकॉमपासून ग्रीन सेक्टरपर्यंत विविध क्षेत्रात रिलायन्स आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहे. मुकेश अंबानी यांच्यापासून ईशा, आकाश आणि अनंत हे रिलायन्स समुहाचे वेगवेगळे व्यवसाय संभाळत आहेत. अंबानी परिवाराच्या नव्या पिढीकडे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत.
गेल्यावर्षी शेअरहोल्डर्सने रिलायन्स इंडस्ट्रीजचे डायरेक्टर आकाश, ईशा आणि अनंत अंबानी यांना सहभागी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. या 3 भावा-बहिणींना रिलायन्स इंडस्ट्रीचे समसमान शेअर्स देण्यात आले. विशेष म्हणजे इतकेच शेअर्स मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्याकडेदेखील आहेत. असे असताना या सर्वांपेक्षा जास्त शेअर्स घरातील एका सदस्याकडे आहेत.
मुकेश आणि अंबानी यांची आई कोकिलाबेन धीरु अंबानी यांच्याकडे सर्वाधिक शेअर्स आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअरहोल्डींग पॅटर्ननुसार डिसेंबर 2023 पर्यंत प्रमोटर्सकडे कंपनीची 50.30 टक्के भागीदारी होती. तर पब्लिक शेअरहोल्डिंग 49.70 टक्के आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रमोटर्समध्ये अंबानी परिवाराचे एकूण 6 सदस्य आहेत. ज्यामध्ये मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी, आकाश, ईशा आणि अनंत अंबानी यांच्याकडे समान 80,52, 021 शेअर्स आहेत. जी कंपनीच्या 0.12 टक्के भागीदारी आहे.
मुकेश अंबानी यांची आई कोकिलाबेन धीरु अंबानी यांच्याकडे 1 कोटी 57 लाख 41 हजार 322 शेअर्स म्हणजेच कंपनीची 0.24 टक्के भागीदारी आहे. कोकिलाबेन या रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये अंबानी परिवारातील सर्वात मोठ्या शेअरधारक आहेत. याशिवाय कोकिलाबेन यांच्याकडे जियो फायनांशियल सर्व्हिसेस लिमिटेडची मोठी भागीदारी आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये गुरुवारी उतार पाहायला मिळाला. रिलायन्सचे शेअर गुरुवारी 1.63 टक्क्यांनी पडून 2,957 रुपये प्रति शेअरवर बंद झाले होते. याशिवाय 52 आठवडे हाय लेव्हल 3,024.90 रुपये आणि 52 आठवड्यांचा लो लेव्हल 2,180 रुपये आहे. कंपनीचचा मार्केट कॅप 20 लाख कोटी रुपये आहे. एका वर्षात या शेअरने 22.32 टक्के रिटर्न दिले आहे.