लुधियाना: जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा भारतातून ब्रिटीशांकडे कसा गेला, याबाबतच्या चर्चेला नव्याने तोंड फुटले आहे. एप्रिल २०१६ मध्ये केंद्र सरकारने न्यायालयाला दिलेल्या माहितीत ब्रिटिशांनी कोहिनूर हिरा बळजबरीने किंवा चोरून नेल्याचे स्पष्टीकरण दिले होते. महाराजा रणजित सिंग यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी ब्रिटिशांना भेट म्हणून कोहिनूर दिल्याचा दावा सरकारने केला होता.
मात्र, आता पुरातत्व खात्याने (एएसआय) मोदी सरकारच्या विधानाला छेद देणारा खुलासा केला आहे. एका माहिती अधिकार याचिकेला उत्तर देताना पुरातत्व खात्याने म्हटले आहे की, लाहोरच्या महाराजांनी ब्रिटीशांसमोर शरणागती पत्कारताना इंग्लंडच्या राणीला हिरा दिला.
तर सरकारच्या दाव्यानुसार महाराजा रणजित सिंग यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी अँग्लो- शीख युद्धाचा खर्च भरून काढण्यासाठी स्वेच्छेने कोहिनूर ब्रिटिशांना दिला.
केंद्र सरकार आणि पुरातत्व खात्याच्या या परस्परविरोधी विधानांमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मोदी सरकार यावर काय स्पष्टीकरण देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.