ट्रेनमधील दरवाजा जवळची खिडकी इतर खिडक्यांपेक्षा वेगळी का असते? यामागचं कारण खुपच खास

 रेल्वेच्या दरवाजा जवळची खिडकी ही बाकिच्या खिडक्यांपेक्षा थोडी वेगळी असते. मग असे का असते याचा तुम्ही कधी विचार केलाय? 

Updated: Jun 1, 2022, 02:37 PM IST
ट्रेनमधील दरवाजा जवळची खिडकी इतर खिडक्यांपेक्षा वेगळी का असते? यामागचं कारण खुपच खास title=

मुंबई : भारतात ट्रेनचा प्रवास हा सर्वात सोपा आणि सोयीस्कर प्रवास मानला जातो. भारतीय रेल्वेचे जाळे दूरवर पसरलेले आहे. त्यामुळे श्रीमंत असो की गरीब, प्रत्येकाच्या बजेटमध्ये रेल्वेची तिकिटे उपलब्ध होते. शिवाय यामुळे ठराविक ठिकाणी वेळेवर देखील पोहोचतो. ट्रेनचे वेगवेगळे नियम आहेत, ज्यांपैकी काही नियम आपल्याला माहित असतात तर काहींबद्दल आपल्याला माहिती नसते.

आता हेच बघा ना रेल्वेच्या दरवाजा जवळची खिडकी ही बाकिच्या खिडक्यांपेक्षा थोडी वेगळी असते. मग असे का असते याचा तुम्ही कधी विचार केलाय? 

तुम्ही अनेकदा ट्रेनने प्रवास केला असेल, पण तुम्ही कधी या गोष्टी वर लक्ष दिले आहे का? जवळपास सर्वच गाड्यांमध्ये असे असते. तुम्ही कोणत्याही ट्रेनकडे पाहिले तरी त्यांच्या खिडक्यांचा हा फरक तुम्हाला दिसेल. पण यामागचे कारण अनेकांना माहीत नाही.

आज आम्ही तुम्हाला याचे कारण सांगणार आहोत.

अधिक बार वापरले जातात

ट्रेनमध्ये अनेक प्रकारच्या बोगी असतात. यामध्ये एअर कंडिशनर ते स्लीपर आणि सामान्य बोगी असतात. यामध्ये एसी बोगी वगळता इतर सर्व खिडक्या याच पॅटर्नमध्ये बनवल्या आहेत. फक्त दरवाजाजवळच्या खिडकीला बाकीच्यांपेक्षा जास्त आडवे बार लावले जातात. इतर खिडक्यांमध्ये हे बार फारच कमी असतात. यामुळे ट्रेनच्या आतुन काहीही बाहेर टाकणे शक्य होत नाही.

आता तुम्ही विचार करत असाल की, फक्त दरवाज्या जवळच्या खिडकला असे जास्त बार लावण्याचा अर्थ काय? कारण कोणाला काही खिडकीतून बाहेर टाकायचं जरी असलं, तरी लोक ते उर्वरीत खिडकीतून टाकू शकतात. मग याच खिडकीला जास्त बार का? 

खरं तर, या खिडकीतून माल चोरीला जाण्याची शक्यता अधिक आहे. प्रवासी झोपल्यावर दरवाज्याजवळील खिडकीतून चोरटे बहुतांश सामान चोरून नेतात.

चोरांपासून लोकांच्या सामानाचे रक्षण करण्यासाठी दरवाजा जवळच्या खिडक्यांमध्ये आणखी बार लावण्यात आले होते, जेणेकरून चोर खिडकीतून सामान चोरून पळून जाऊ नयेत.