मुंबई : देशातील सर्वाधिक चर्चेत आणि विवादित अयोध्या खटल्या प्रकरणावर शनिवारी 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता सर्वोच्च न्यायालय निर्णय सुनावणार आहे. या प्रकरणाचा निकाल न्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई निवृत्तीपूर्वी देणार आहेत. या सुनावणीकरता शनिवारच का निवडण्यात आला? यामागे नेमकं कारण काय? जाणून घेऊया.
न्यायमूर्ती गोगोई 17 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. या दिवसापर्यंत अयोध्या प्रकरणाची सुनावणी कधीही होऊ शकते मात्र 17 नोव्हेंबर रोजी रविवार आहे. आणि इतका मोठा निर्णय रविवारी कसा द्यायचा याकरता तो आज शनिवारी देण्यात येत आहे. तसेच न्यायाधीश गोगोई निवृत्त होण्याअगोदर 16 नोव्हेंबर शनिवार आणि 17 नोव्हेंबर रविवार आहे. त्यामुळे गोगोई यांचा 15 नोव्हेंबर हा शेवटचा कामकाजाचा दिवस असणार आहे.
अयोध्या रामजन्मभूमी प्रकरणी सुनावणीदरम्यान जर काही तांत्रिक अडचण आली किंवा प्रतिवाद करण्याकरता कुणीही न्यायालयाचा आधार घेऊ शकतो. याकरता जास्त दिवसांची आवश्यक आहे. जर निर्णय 14 नोव्हेंबर किंवा 15 नोव्हेंबर रोजी दिला तर त्याकरता कमी अवधी मिळेल याकरता हा निर्णय 9 नोव्हेंबर रोजी सुनावण्यात येणार आहे.
याकरता शुक्रवारी रात्री ही सूचना देण्यात आली की, शनिवारी सकाळी साडे दहा वाजता निर्णय सुनावण्यात येणार आहे. साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या निकालाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश, दिल्लीसह बऱ्याच ठिकाणांना छावणीचं स्वरुप आलं आहे. शिवाय राज्यातही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निकालाच्या धर्तीवर अयोध्या आणि जम्मू काश्मीर येथे कलम १४४ लागू करण्यात आला आहे.