अशा ठरतात सोन्याच्या किंमती, ..म्हणून शहरांनुसार बदलतात भाव

 सोन्याच्या किंमती कोण ठरवतं ? त्या कशा ठरतात ? यासंदर्भात आपण माहिती घेऊया..

Updated: Nov 29, 2018, 08:15 AM IST
अशा ठरतात सोन्याच्या किंमती, ..म्हणून शहरांनुसार बदलतात भाव title=

नवी दिल्ली : सोनं आणि चांदीच्या किंमतीत होणारी घट पाहून आपल्याला नेहमी आनंदच वाटतो. यांच्या घसरलेल्या किंमती पाहूनच आपण सोनं खरेदीची योजना आखत असतो.  बऱ्याचदा टीव्ही किंवा वर्तमानपत्रात दाखवलेल्या किंमतीपेक्षा सोन्याचा भाव अधिक असतो असं देखील आपण पाहिलं असेल. वेगवेगळ्या शहरातल्या किंमतीही वेगवेगळ्या असतात हे देखील आपण पाहिलं असेल. असं का होतं? सोन्याच्या किंमती कोण ठरवतं ? त्या कशा ठरतात ? यासंदर्भात आपण माहिती घेऊया..

बाजारात सोन्याच्या फ्यूचर प्राईस आणि स्पॉट प्राईस अशा दोन किंमती असतात. दोन्हींच्या किंमती वेगवेगळ्या असतात.

तुम्ही आम्ही जे सोनं खरेदी करतो ते स्पॉट प्राइसनुसार असतं. फ्यूचर प्राईस ही कमोडीटी एक्सचेंजवरील उद्योजकांसाठी असते ज्या किंमतीत चढ उतार पाहायला मिळतात.

ज्या प्रमाणे शेअर बाजारात चढ उतार पाहायला मिळतात त्याचप्रमाणे इथेही ते दिसून येतात.

gold

भारतात अशा ठरतात सोन्याच्या किंमती 

gold

भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतीत मल्टी कमोडीटी एक्सचेंज (MCX) वरून ठरतात.

या संस्थेतर्फे सोन्याची मागणी-पुरवठा आणि जागतिक बाजारातील सोन्याच्या किंमत लक्षात घेऊन किंमत ठरवली जाते.

फ्यूचर बाजाराच्या किंमती या स्पॉट किंमतींपेक्षा कमी असतात हे आपण लक्षात ठेवायला हवं.

तसेच फ्यूचर बाजारच्या किंमती या देशभरात एकसमानही असतात.

अशी ठरते किंमत 

बाजारातून ज्या किंमतीत तुम्ही सोनं खरेदी ती स्पॉट किंमत असते. अनेक शहरात सराफा असोसिएशनचे सदस्य मिळून बाजार उघडल्यानंतर किंमती ठरवतात. एमसीएक्स फ्यूचर बाजारात ज्या किंमती असतात त्यामध्ये वॅटसारखे कर जोडून किंमती ठरवल्या जातात. याच किंमती संपूर्ण दिवस असतात.

यामुळेच वेगवेगळ्या शहरातील किंमती वेगवेगळ्या असतात. याशिवाय स्पॉट मार्केटमधील सोन्याच्या किंमती शुद्धतेच्या आधारावर ठरतात.

22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात.