Traffic Rules: Traffic पोलिसांनी अडवल्यानंतर तुम्हीही या चुका करता का? थांबा आधी हे वाचा

Traffic Rules: तुम्हाला अडचणीत यायचे नसेल तर वाहन चालवताना काही महत्तवाचे कागदपत्र नेहमी सोबत ठेवा.

Updated: Sep 15, 2022, 01:34 PM IST
Traffic Rules: Traffic पोलिसांनी अडवल्यानंतर तुम्हीही या चुका करता का? थांबा आधी हे वाचा  title=

Traffic Rules you must know: रस्त्यावर वाहन चालवताना बऱ्याचदा ट्रॅफिक पोलीस (Traffic Police) काही न काही कारणांसाठी थांबवतात. जर आपण नियमांचे पालन करत आहोत आणि नियमांचे उल्लंघन होत नसेल तर आपल्याला घाबरण्याची आवश्यकता नाही. परंतू र्दुदैव असे आहे की भारतात आपण पोलीसांच्या वागणुकीचे प्रत्यक्षिके एकतो आणि पाहतो. अशा वेळेस वाहनधारकांना आपल्या अधिकारांविषयी माहिती असणे खुप महत्तवाचे आहे. 

ही महत्तवाची कागदपत्र नेहमी सोबत ठेवा
तुम्हाला अडचणीत यायचे नसेल तर वाहन चालवताना काही महत्तवाचे कागदपत्र नेहमी सोबत ठेवा.

नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) (Registration certificate) 
प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) (Pollution under control)   
विमा दस्तऐवज (Insurance document)
वाहन चालवण्याचा परवाना (Driving licence)
(Know what are the rights of the traffic police 5 rules)

 

आणखी वाचा... जेव्हा आई मुलाला Long Drive वर नेते; इंटरनेटवर सुस्साट Viral होतोय हा Video

महत्त्वाचे नियम तुमच्यासाठी 
1. ट्रॅफिक पोलीस (Traffic Police) हा नेहमी त्याच्या गणवेशात असला पाहिजे जर तो पोलीस गणवेशात नसेल तर तुम्ही त्याच्याजवळून ओळखपत्र  (Identification Card) मागू शकता. जर ट्रॅफिक पोलीस (Traffic Police) ओळखपत्र दाखवायला तयार नसेल तर तुम्ही देखील तुमचे कागदपत्र दाखवायला नकार देऊ शकता. 

2. जर कोणत्याही ट्रॅफिक नियमांचे उल्लघन केल्यास तुमच्यावर दंड (Fine) लागू केला जातो, त्या दंडाची पावती ई-चलान मशीन किंवा पावती बुक मध्ये येणे आवश्यक आहे. जर ती पावती तुमच्याजवळ नसेल तर एकप्रकारे तुम्ही लाच (Bribe) देत आहात असे गृहित धरले जाते.

3. जर ट्रॅफिक पोलीस तुमचे कोणतेही कागदपत्र (Document) जप्त करण्याचा निर्णय घेत असेल तर कागदपत्र (Document) जप्त करण्याचीदेखील पावती ट्रॅफिक पोलीसांकडुन (Traffic Police) घ्यायची. 

4. कोणताही ट्रफिक पोलीस (Traffic Police) अधिकारी तुम्हाला न विचारता किंवा तुमच्या परवानगीशिवाय गाडीची चावी घेऊ शकत नाही. 

5. जर तुम्ही वाहनाच्या आत बसले असाल तर ट्रॅफिक पोलीस तुमच्या वाहनाला टो करु शकत नाही.