तुम्हाला माहित आहे का? ''महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा'' कंपनीचं पाकिस्तानशी कनेक्शन?

आनंद मेहेंद्रा हे भारतातील मोठे बिझनेसमॅन आहेत. ज्यामुळे भारतात जवळ जवळ सगळेच लोकं त्यांना ओळखतात.

Updated: Jun 14, 2021, 03:29 PM IST
तुम्हाला माहित आहे का? ''महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा'' कंपनीचं पाकिस्तानशी कनेक्शन? title=

मुंबई : आनंद मेहेंद्रा हे भारतातील मोठे बिझनेसमॅन आहेत. ज्यामुळे भारतात जवळ जवळ सगळेच लोकं त्यांना ओळखतात. परंतु काही लोकं असे ही आहेत की, जे त्यांना बिझनेसमॅन नाही तर त्यांच्या समाजकार्य आणि कर्तुत्वाने ओळखतात. सध्या महेंद्रा अ‍ॅण़्ड महेंद्राचे नवीन डायरेक्टर आणि CEO अनीष शाहा आहेत. ही गोष्ट आपल्या देशाला जाणून घेणे महत्वाचे आहे, कारण महेंद्रा अ‍ॅण़्ड महेंद्रा हे भारताच्या कॉर्पोरेट जगाचे सर्वात मोठे आधार स्तंभ आहे.  जे भारताच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावतात.

महेंद्रा ग्रुपमध्ये लोखो कामगार काम करतात. ज्यामुळे भारतातील अनेक घरात चुली पेटतात. परंतु या कंपनीचा आपला स्वता:चा एक इतिहास आहे जो फार कमी लोकांना माहित असावा.

1947 पर्यंत या कंपनीचे नाव 'महेंद्रा अ‍ॅण्ड मोहम्मद' होते. 1945 मध्ये आनंद महेंद्रा यांचे आजोबा कैलाश चंद्र महेंद्रा यांनी गुलाम मोहम्मद यांच्या सोबत मिळून एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी उघडली होती. ज्यासा एमएएम म्हणून सुद्धा ओळखले जात होते.

देश स्वातंत्र झाल्यानंतर देशाच्या फाळणी दरम्यान गुलाम मोहम्मद पाकिस्तानमध्ये निघून गेले. ज्यामुळे त्याच्यामधील करार संपला. परंतु  महेंद्रा अ‍ॅण्ड मोहम्मद कंपनी पाकिस्तानमधून भारतीय बाजारात जिप विकू लागली. ज्यामुळे भारतातील महेंद्रा कंपनीला नुकसान होऊ लागले. या गोष्टीला स्वत: आनंद महेंद्रा यांनी 2006 मध्ये मान्य केले होती. परंतु कंपनीने हार मानली नाही.

कंपनीचे सध्याचे टर्न ओव्हर 19 बिलियन डॉलर आहे.

आनंद महेंद्रा यांचा जन्म 1955मध्ये झाला. त्यांनी Harvard University मधून MBA चे शिक्षण घेतले. त्य़ानंतर त्यांनी अनुराधा नावाच्या एका पत्रकार महिलेशी लग्न केलं आहे. त्या दोघांना दोन मुली आहेत. त्यांच्या मोठ्या मुलीचे नाव अलीका महेंद्रा आणि छोट्या मुलीचे नाव दिव्या महेंद्रा आहे.