नोएडा : यूपीमधील ग्रेटर नोएडाच्या पूर्वांचल सिल्व्हर सिटी सोसायटीमधून 6.5 कोटी रोख रक्कम आणि 40 किलो सोनं चोरीला गेले आणि ते चोरीला गेलेल्या वस्तू रमणी पांडे आणि त्यांचा मुलगा किश्ले पांडे यांचा असल्याचे समजते. आता पोलिसांच्या तपासणीत ही संपत्ती या दोघांच्या मालकीची नक्की आहे का? आणि जरी ती असली तरी ती त्यांनी कशी मिळवली? हे सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा करण्यास सुरवात केलीआहे. शनिवारी पोलिसांनी ग्रेनो येथे किश्ले पांडे यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली होती. त्यानंतर यावर किश्लेने आपल्या ट्विटर अकाउंटवरून याप्रकरणी निवेदन जारी केले आहे.
My Statement…
@PMOIndia @myogiadityanath @noidapolice pic.twitter.com/dt6bx9QPOj— DR. KISLAY PANDAY (@kislaypanday) June 13, 2021
पोलिसांनी या बाप लोकांच्या कंपन्या आणि हालचालींवर लक्ष ठेवून, संबंधीत गोष्टींचीच्या हालचालींचे रेकॉर्ड गोळा केले आहेत. या संदर्भात नोएडा पोलिसांचे उच्चस्तरीय अधिकारी आणि तपास पथकाचे नेतृत्व करणारे अधिकारी शनिवारी आणि रविवारी आयुक्तालय मुख्यालयात भेटले. जेथे त्यांनी या विषयांवर कित्येक तास बोलणी केली.
पोलिसांनी या घटनेची माहिती ईडी आणि इनकम टॅक्सला दिली आहे. आता इनकम टॅक्स आणि ईडी या दोघांकडून या सगळ्या प्रकरणावर तपास सुरू आहे. परंतु या प्रकरणात नवीन गुन्हा नोंदवला जाईल की, पोलिसांकडून नोंदवलेल्या वसुली संदर्भात चौकशी पुढे नेली जाईल? हे अद्याप ठरलेले नाही.
आम्ही दोघेही परदेशात असल्याचे किस्ले पांडे यांनी पोलिसांना सांगितले आहे. यानंतर पोलिसांनी दोघांच्याही पासपोर्टची माहिती मिळवण्यासाठी अर्ज केला आहे.
सोमवारी नोएडा पोलिसांना ही माहिती मिळेल असा विश्वास आहे. पास्पोर्टमुळे हे दोघेही बाप लेक कधी भारतात आले आणि कधी परत गेले? ही माहिती पोलिस अधिकाऱ्यांना मिळेल. जी या केस चा तपास करण्यात पोलिसांची मदत करेल असा दावा त्यांनी केला आहे. ज्यामुळे पोलिसांच्या हाती काही प्रमुख गोष्टी लागतील असे त्यांचे म्हणणे आहे.