जाणून घ्या पेट्रोल-डिझेलच्या आजच्या किंमती

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ५ आठवड्यानंतर वाढल्या

Updated: Nov 8, 2019, 01:04 PM IST
जाणून घ्या पेट्रोल-डिझेलच्या आजच्या किंमती title=

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ५ आठवड्यानंतर वाढलेल्या पाहायला मिळत आहेत. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत ९ ते १० पैशांची वाढ केली आहे. दिल्ली, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोल १० पैसे तर कोलाकातामध्ये ९ पैसे प्रति लीटरने पेट्रोल महागले आहे. तर डिझेलची किंमत दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये नऊ पैसे तर मुंबईमध्ये १० पैसे प्रति लीटर झाली आहे. 

मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत ७८.३८ रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेल ६९.०६ रुपये आहे. दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत क्रमश: ७२.७० रुपये, ७५.४१ रुपये आणि ७५.५५ रुपये प्रति लीटरने उपलब्ध आहे. तर डिझेलचे दर देखील ६५.८४ रुपये. ६८.२५ रुपये आणि ६९.५९ रुपये प्रति लीटर झाले आहेत.