मुंबई : एक अशी जागा आहे जिथे पक्षी सामूहिक आत्महत्या करत असल्याच निदर्शनास आलं आहे. ही जागा त्यासाठीच लोकप्रिय आहे. ही जागा आहे जतिंगा घाटी. ही जागा भारताच्या उत्तर पूर्वी राज्य असलेल्या आसामच्या जतिंगा गावात आहे. इथे एक पक्षी नाही तर एकाच वेळी त्यांचा पूर्ण समूह एकत्र आत्महत्या करतात.
असं सांगितलं जातं की, पावसाळ्याच्या अखेरीस जेव्हा या ठिकाणी चंद्र नसतो. तेव्हा अंधाऱ्या रात्री संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजून 30 मिनिटांमध्ये ही घटना घडते. हे करण्यामागची कारण वेगवेगळी सांगितली जातात. असं म्हटलं जातं की, हे करण्यामागे काही अदृश्य शक्तींचा हात आहे. तर वैज्ञानिकांच असं म्हणणं आहे, रात्री हवेचा जोर जास्त असतो अशामध्ये पक्षांच संतुलन बिघडतं यामुळे त्यांचा मृत्यू होतो. या ठिकाणी घनदाट जंगल आहे. यामुळे या ठिकाणी प्रकाश येत नाही त्यामुळे झाडांना आपटून त्यांचा मृत्यू होतो.
हे गूढ उकलण्यासाठी भारत सरकारने प्रसिद्ध पक्षी अभ्यासक डॉ सेन गुप्ता यांना नियुक्त केले आहे. त्यांनी यावर अभ्यास करताना सांगितलं की, वातावरणातील बदल आणि चुंबकीय शक्तीमुळे हे होत आहे. या घाटात 44 स्थानीक पक्षी राहतात. ज्यामध्ये टायगर बिट्टर्न, ब्लॅक बिट्टर्न, लिटिल इहरेट, पॉन्ड हेरॉन, इंडियन पिट्टा आणि किंगफिशर यासारखे पक्ष्यांचा समावेश आहे.