तांदूळ चोरीच्या संशयावरून आदिवासी तरूणाला मारहाण करून हत्या

केरळमध्ये एका आदिवासी तरूणाला मारहाण करून त्याची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र या मारहाणीमागील कारण फारच क्षुल्लक असल्याने त्याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. 

Updated: Feb 23, 2018, 09:28 PM IST
तांदूळ चोरीच्या संशयावरून आदिवासी तरूणाला मारहाण करून हत्या   title=

मुंबई : केरळमध्ये एका आदिवासी तरूणाला मारहाण करून त्याची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र या मारहाणीमागील कारण फारच क्षुल्लक असल्याने त्याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. 

चोरीचा आरोप 

 केरलमधील कडूकुम्न्ना येथील 27 वर्षीय आदिवासी तरूण ए मधूला काही लोकांनी गुरूवारी जंगलात पकडले. तेथे त्याला मारहाण झाली. मोठ्या जमावाने त्याला चोरी केल्याचा प्रयत्न पाहून मारहाण केली होती. या युवकाला गंभीर स्वरूपाची मारहाण करण्यात आली आहे. त्याला हॉस्पिटलला नेण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे.  

कशाची  केली चोरी ?

 गर्दीने केलेल्या आरोपानुसार, तीन दिवसांपूर्वी या तरूणाने खाण्याचे काही सामान चोरण्याचा प्रयत्न केला होता. मधूला जमलेल्या लोकांनी दोरीने बांधले होते. त्याला लाथा-बुक्क्याचा मार दिला. दरम्यान काही लोकांनी या वेळेस सेल्फीदेखील क्लिक केला आहे. 
 
 पोलिसांना या घटानेची माहिती मिळाल्यानंतर तेथे पोहचले. गर्दीने दिलेल्या माहितीनुसार, मधू 2016 पासून खाण्याचे पदार्थ चोरत होता. त्याच्यावर तांदूळ आणि इतर खाण्याच्या वस्तू चोरण्याचा आरोप करण्यात आला आहे. 

मानसिक रूग्ण 

मधूच्या मृत्यूनंतर पोलिसांनी सुमारे 15 लोकांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप लावून त्यांच्यावर केस नोंदवण्यात आली आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर पुढील कारवाई ठरवली जाणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मधू हा मानसिक रूग्ण होता. तो जंगलात राहत होता तसेच त्याचा कुटुंबातील इतर व्यक्तींशी कोणताच संपर्क नव्हता.