देव तारी त्याला कोण मारी! आधी दुचाकी नंतर बसला धडकला; तरीही...

एक छोटा मुलगा सायकल चालवत अतिशय वेगानं अचानक रस्त्यावर आला. आणि... 

Updated: Mar 25, 2022, 04:26 PM IST
 देव तारी त्याला कोण मारी! आधी दुचाकी नंतर बसला धडकला; तरीही...  title=

मुंबई : आता एक काळजाचा ठेका चुकवणारी बातमी. देव तारी त्याला कोण मारी, याचा प्रत्यय देणारी बातमी. अक्षरशः एखाद्या सिनेमात असावी, अशी घटना प्रत्यक्षात घडली आहे. केरळमधला हा व्हिडीओ आहे.

एक छोटा मुलगा सायकल चालवत अतिशय वेगानं अचानक रस्त्यावर आला. छोट्या मुलाची सायकल अतिशय वेगात एका बाईकला धडकली. बाईकची धडक बसून तो मुलगा सायकलवरुन उडाला आणि रस्त्यावर पडला..

पाठीमागून बस येत होती, त्या छोट्या मुलाची सायकल बसखाली आली.  सायकल अक्षरशः चिरडली गेली. पण तो मुलगा एवढा भाग्यवान होता की तो रस्त्याच्या कडेला फेकला गेला आणि त्याचा जीव वाचला.

बस निघून गेल्यावर तो मुलगा लगेचच उभा राहिला. त्याच्या हाताला फक्त खरचटलं. अवघ्या एखाद्या सेकंदाची जरी गडबड झाली असती तरी सगळा खेळ खल्लास झाला असता.

मृत्यूला चकवा देणं म्हणजे काय, नशिब म्हणजे काय, या सगळ्यावर विचार करायला लावणारा हा जबरदस्त व्हिडीओ समोर आलाय...