कर्नाटकच्या आमदारांना केरळने दिलं अनोखं आमंत्रण

कर्नाटकच्या आमदारांना केरळची ऑफर

शैलेश मुसळे | Updated: May 15, 2018, 06:59 PM IST
कर्नाटकच्या आमदारांना केरळने दिलं अनोखं आमंत्रण title=

बंगळुरु : नुकताच पार पडलेल्या कर्नाटक निवडणुकीचा निकाला लागाला आहे. भाजपला जरी चांगलं यश मिळालं असलं तरी बहुमत न मिळाल्याने भाजपची निराशा झाली आहे. एकीकडे भाजप यशांचं जल्लोष करत असतांना काँग्रेसने खेळी करत भाजपपुढे मोठं आव्हान उभं केलं आहे. काँग्रेसने जेडीएसला जाहीर पाठिंबा देत भाजपच्या आनंदावर पाणी फेरलं आहे. त्यानंतर लगेचंच भाजप नेत्यांनी देखील हालचाल सुरु केल्या आहे.

काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष सत्ता स्थापनेसाठी आता प्रयत्न करतांना दिसणार आहे. भाजपपेक्षा काँग्रेस आणि जेडीएसकडे बहुमत जास्त आहे. पण त्यातच काँग्रेसच्या लिंगायत समाजाच्या 10 आमदारांनी बंडाचा इशारा दिला आहे. काँग्रेसच्या लिंगायत समाजाच्या आमदारांचं जेडीएसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कुमारस्वामी यांना विरोध आहे. काँग्रेसपुढे आता या आमदारांचं बंड थंड करण्याचं मोठं आव्हान असणार आहे. निवडणुकीत आमदार फुटू नये म्हणून पक्ष आमदारांना अज्ञात स्थळी ठेवतं, त्यातच अशी बातमी येत आहे की, काँग्रेस आमदारांना कर्नाटक राज्याच्या बाहेर ठेवणार आहे. त्यामुळे हीच संधी साधत कदाचित केरळ पर्यटन विभागाने आमदारांना केरळमध्ये येण्याचं आमंत्रण दिलं आहे.

केरळ टुरिझमने ट्विट करत आमदारांना केरळमध्ये येण्याचं आमंत्रण दिलं आहे.