कानडी कौल : दोन्ही मतदारसंघात सिद्धारामय्या पिछाडीवर

काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर पहायला मिळत असून, कोण बाजी मारते याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण  

Updated: May 15, 2018, 10:51 AM IST
कानडी कौल : दोन्ही मतदारसंघात सिद्धारामय्या पिछाडीवर title=

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवणूकीत अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे आणि मुख्यमंत्री पदाचे उमेदवार सिद्धारामय्या यांच्यासाठी मोठा धक्का आहे. हाती येत असलेल्या कल पाहता सिद्धरामय्या हे बदामी मतदारसंघातून प्रचंड पिछाडीवर आहेत. अर्थात, ते दोन मतदारसंघातून लढत असल्यामुळे निकाल काय येतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. पण, धक्कादायक असे की, ते लढत असलेल्या दोन्ही जागांवर सिद्धरामय्या पिछाडीवर आहेत. त्यातच आतापर्यंत हाती आलेले कल पाहता भाजपने आगाडी घेतली आहे. तर, काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे. जेडीएस तिसऱ्या क्रमांकावर असून, तो किंगमेकरची भूमिका बजावू शकतो.

काय आहेत आतापर्यंतचे कल?

हाती आलेला कल पाहता भाजपने ९३ तर, काँग्रेसने ८८ जागांवर आघाडी घेतली आहे. तर, दुसऱ्या बाजूला जेडीएसनेही आपली कमगिरी सुधारली असून, जेडीएस सध्या २६ जागांवर आघाडीवर आहे. एकूण २२२ मतदारसंघापैकी ३० मतदारसंघातील कल हाती येणे बाकी आहे. मात्र, उर्वरीत मतदारसंघातील कल पाहता भाजपने जोरदार बाजी मारली आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर पहायला मिळत असून, कोण बाजी मारते याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण  

ताजे अपडेट कुठे पहाल?

दरम्यान,  आजच्या निकालाचे ताजे अपडेट आपणही जाणून घेऊ शकता. निकालाचे ताजे अपडेट आपल्याला  http://zeenews.india.com/marathi/live  पाहता येतील. तसेच, भारतीय निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाईट election commission of india ला सुद्धा आपण भेट देऊ शकता.