बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचे पानिपत

एकीकरण समितीमध्ये फूट पडू नये म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आले. मात्र त्याला यश आले नाही. 

Updated: May 15, 2018, 05:06 PM IST
 बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचे पानिपत title=

बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राच्या उत्सुकतेचा विषय म्हणजे बेळगाव आणि महाराष्ट्र एकिकरण सिमती. यंदा तर महाराष्ट्र एकीकरण समितीत उभी फूट पडल्याने मतदारांची फाटाफूट झाली. त्याचा जोरदार फटका या निवडणुकीत समितीला बसला असून, एकूण नऊ पैकी केवळ एका जागेचा अपवाद वगळता इतर ठिकाणी समितीला पिछाडीवर जावे लागले आहे. एकीकरण समितीमध्ये फूट पडू नये म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आले. मात्र त्याला यश आले नाही. बेळगावातील एकूण १८ पैकी ९ जागांवर भाजप, ५ जागांवर काँग्रेस तर, केवळ एका जागेवर महाराष्ट्र एकिकरण आघाडीवर आहे.

बेळगावमध्ये आघाडीवर असलेले उमेदवार (मतदारसंघनिहाय)

बेळगाव ग्रामीण, लक्ष्मी हेबाळकर (काँग्रेस) आघाडीवर
बेळगाव दक्षिण अभय पाटील (भाजप) आघाडीवर
बेळगाव मधील मतदार संघ, बेळगाव दक्षिण- अभय पाटील (भाजप)
बेळगाव उत्तर - अनिल बेनके( भाजप)
बेळगाव ग्रामीण- लक्ष्मी हेब्बाळकर (काँग्रेस)
खानापूर- अरविंद पाटील (महाराष्ट्र एकीकरण समिती)
निपाणी- (भाजप)
चिक्कोडी सदलगा- (काँग्रेस)
गोकाक अरभावी- भालचंद्र जारकेवळी (भाजप)
हुक्केरी
रायबाग
कुडची
कागवाड
अथणी
यमकनमर्डी- सतीश जारकिहोळी (काँग्रेस)
कित्तुर- महानतेश दौडगौडर (भाजप)
बैलहोंगल
सौंदती- आनंद चौप्रा (अपक्ष)

ताजे अपडेट कुठे पहाल?

दरम्यान,  आजच्या निकालाचे ताजे अपडेट आपणही जाणून घेऊ शकता. निकालाचे ताजे अपडेट आपल्याला  http://zeenews.india.com/marathi/live  पाहता येतील. तसेच, भारतीय निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाईट election commission of india ला सुद्धा आपण भेट देऊ शकता.