दैव बलवत्तर! धावत्या ट्रेनमध्ये महिलेला निर्वस्त्र करुन नदीत फेकले, तरीही वाचले प्राण

Crime News Today: कानपूरमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेला धावत्या ट्रेनमधून धक्का देण्यात आला त्यात ती गंभीर जखमी झाली आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 2, 2024, 01:37 PM IST
दैव बलवत्तर! धावत्या ट्रेनमध्ये महिलेला निर्वस्त्र करुन नदीत फेकले, तरीही वाचले प्राण title=
Kanpur Woman without clothes thrown from train 80 feet bridge

Crime News Today:  कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गंगा घाटाच्या जवळ असलेल्या रेल्वे रुळांवर महिला निर्वस्त्र अवस्थेत सापडली होती तर सातत्याने ती रडत होती. नाविकांना ही महिला घाबरलेल्या अवस्थेत असल्याचे दिसताच त्यांनी लगेचच गंगा घाटावर असलेल्या एका व्यक्तीला माहिती दिली. त्यानंतर तिथे असलेल्या व्यक्तींनी तिच्या कपडे देऊन आधी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिच्यासोबत नेमकं काय घडलं याची चौकशी केली असता. तिने जे सांगितलं ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. 

महिलेने सांगितले की, आज मंगळवारच्या सुमारास सकाळी 6 ते 7 वाजण्याच्या सुमारास काही लोकांनी तिला चालत्या ट्रेनमधून धक्का मारला. त्यावेळी ट्रेन गंगा नदीच्या पुलावरुन धावत होती. महिला थेट गंगा नदीच्या पाण्यात पडली. मात्र नदीला पाणी कमी असल्यामुळं ती पोहोत कशीबशी गंगा नदीच्या किनाऱ्यावर पोहोचली. यात ती गंभीर जखमी झाली होती. महिलेवर बेतलेला प्रसंग ऐकून नाविकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेची चौकशी केली. 

नाविकांनी दिलेल्या माहितीनुसार महिला निर्वस्त्र अवस्थेत सापडली होती. पोलिसांनी याबाबत महिलेला तिच्यासोबत काही दुष्कृत्य झालंय का हे विचारलं मात्र त्यावर तिने काहीच म्हटलं नाही. महिलेला खूप धक्का बसला होता त्यामुळं ती काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. सध्या महिलेवर उपचार सुरू असून तिच्यासोबत काही वाईट घडलं आहे का, हे जाणून घेण्यासाठी तिच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात येत आहेत. 

दरम्यान प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा त्यांना महिला दिसली तेव्हा तिच्या शरीरावर एकही कपडा नव्हता. शरीरावरही खूप गंभीर जखमा होता. आम्ही तातडीने तिला अंग झाकण्यासाठी कपडे दिले. मात्र ती खूप घाबरलेली होती. जवळपास 80 फूट उंच पुलावरुन खाली पडल्यामुळं ती खूप गंभीर जखमी झाली होती. 

या प्रकरणात गंगाघाट ठाण्याचे पोलीस अधिकारी राजकुमार यांनी माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शरीरावर खूप गंभीर जखमा आहेत. पण ज्या पुलावरुन महिलेला खाली फेकले तो पुल कानपूर जीआरपी आणि उन्नाव पोलिस ठाण्याच्या अंतर्गंत येतो. दरम्यान महिला घाबरली असल्यामुळं आणि जखमा असल्यामुळं तिच्याकडून अधिक माहिती अद्याप कळलेली नाही.