शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या दलजितवर कंगनाचे 'ट्ववीटर वार'

देशभरात शेतकरी आंदोलन पेटलेलं असताना, बॉलिवूडमधूनही अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.. बॉलिवूड

Updated: Dec 17, 2020, 09:52 PM IST
शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या दलजितवर कंगनाचे 'ट्ववीटर वार' title=

मुंबई : देशभरात शेतकरी आंदोलन पेटलेलं असताना, बॉलिवूडमधूनही अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.. बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत आणि प्रसिद्ध पंजाबी अभिनेता दिलजीत दोसांज या दोघांमध्ये शेतकरी आंदोलनावरुन पुन्हा ट्विटर वॉर सुरु झालंय. दिलजीत शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करतोय, असं म्हणत कंगनाने पुन्हा एकदा दिलजीतला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. 

मात्र यावेळी तिने या वादात अभिनेत्री प्रियांका चोप्राला देखील ओढलंय. काही दिवसांपूर्वी प्रियांकानं ट्विट करत शेतक-यांना पाठिंबा दर्शवला होता.. कंगनाचे हे ट्विट सध्या अनेकांचं लक्ष्य वेधून घेतंय.

काय म्हणाली कंगना -

''दिलजीत आणि प्रियांका चोप्रा जे शेतकऱ्यांना पाठिंबा दिल्याचा आव आणत आहेत, त्यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून आपली भूमिका मांडावी. उगाच सरकारला विरोध करायचाय म्हणून टीका करु नये.''

अभिनेत्री कंगना रनौत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विरोध करत असताना, दुसरीकडे दिलजीत शेतकऱ्यांना पाठिंबा देत कंगनावर निशाणा साधतोय. दोघांमध्ये सुरु असलेलं हे ट्विटर वॉर आता आणखी पेटलंय.