कमलेश तिवारीवर १३ वेळा चाकूचे सपासप वार, सात संशयित पोलिसांच्या ताब्यात

कमलेशला ज्या व्यक्तीनं शेवटचा कॉल केला ती व्यक्ती सध्या फरार आहे

Updated: Oct 19, 2019, 10:49 PM IST
कमलेश तिवारीवर १३ वेळा चाकूचे सपासप वार, सात संशयित पोलिसांच्या ताब्यात title=
फाईल फोटो

लखनऊ :  हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी हत्येप्रकरणी सात संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली असून सातही जणांची कसून चौकशी करण्यात आली. सीसीटीव्हीच्या आधारे या संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय. सूरतमध्ये ही कारवाई करण्यात आली असून आता लखनऊ पोलीस चौकशीसाठी सुरतमध्ये येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी, तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर, रशीद पठाण हा या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे. सध्या या सर्वांची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, कमलेश तिवारी हत्याकांडात शनिवारी सायंकाळी शवविच्छेदन अहवालही समोर आलाय.

कमलेश तिवारी हत्याकांड LIVE UPDATES: बिजनौर से दो मौलाना, सूरत 3 संदिग्ध गिरफ्तार, लखनऊ पुलिस जाएगी गुजरात
संशयित आरोपी

शवविच्छेदन अहवालानुसार, मारेकऱ्यांनी कमलेश तिवारी याच्यावर धारदार आणि टोकदार हत्यारांनी तब्बल १३ सपासप वार केले होते. इतकंच नाही तर कमलेश याच्यावर गोळीही झाडण्यात आलीय. कमलेश तिवारी याच्या उजव्या बाजुला २, डाव्या बाजुला ८ तर मागच्या बाजुनं ३ वेळा चाकूचे वार करण्यात आलेत. तर कमलेशच्या जबड्यात गोळी मारण्यात आलीय.

कमलेश तिवारी याचा मोबाईल क्रमांक आणि घराचा पत्ता सोशल मीडियावर सहजच उपलब्ध होता, असंही पोलीस तपासात समोर आलंय. याचमुळे मारेकरी त्याच्यापर्यंत सहज पोहचू शकले. पोलिसांनी कमलेशच्या मोबाईलची कॉल डिटेल्सही खंगाळून काढलीय.

कमलेशला ज्या व्यक्तीनं शेवटचा कॉल केला ती व्यक्ती सध्या फरार आहे. पोलिसांच्या दृष्टीने हाच आरोपी आहे. कथित रुपात तो एका महिलेसोबत सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतोय. ही महिला लखनऊच्या मडियावमध्ये राहणारी शहनाज बानो आहे. शहनाजच्या म्हणण्यानुसार, 'मारेकऱ्यांनी तिला कमलेशचा पत्ता विचारला होता. त्यावर आपल्याला माहित नसल्याचं तिनं सांगितलं होतं... पोलिसांकडून अद्याप या महिलेची चौकशी सुरू आहे.