न्या.लोया मृत्यूप्रकरण : स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी

न्या. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आता सोमवारी पुढील सुनावणी होणार आहे.

Updated: Feb 2, 2018, 05:28 PM IST
 न्या.लोया मृत्यूप्रकरण : स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी title=

रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : न्या. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आता सोमवारी पुढील सुनावणी होणार आहे. लोया संशयित मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दोन तास सुनावणी झाली.

या सुनावणीतील महत्त्वाचे मुद्दे

 - लोया यांच्या कुटुंबियांना न्यायालयात बोलवावे
- न्यायमूर्तींनी लोया यांच्या कुटुंबीयांशी खटला चालविण्याबद्दल चेंबर मध्ये चर्चा करावी
- लोया कुटुंबियांचा नकार असेल खटला चालवू नये
- वकील दुष्यंत दवे यांनी न्यायालयाला केली विनंती

महाराष्ट्र सरकारचे मुख्य सरकारी वकील निशांत कातनेश्वरकर यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहीती झी २४ तास ला दिली आहे. 

नेमकं काय झालं ?

 - महाराष्ट्र सरकारने कागदपत्रे उपलब्ध करून दिली नसल्याचा मुद्दा
याचिकाकर्त्यांच्या वकीलांनी मांडला
- याचिकाकर्ता वकीलांनी स्पीड पोस्टाने मागणी केली. ते अद्याप मिळाले नाही
- मी न्यायालयाला सांगितले की, न्यायालयातच मागितले असते कागदपत्रे दिली असती
- महाराष्ट्र सरकारची पूर्ण तयारी आहे.
- स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे
- पण आणखी कोणत्या चौकशीची आवश्यकता आहे का ?