देशभरात सिंगल डोस व्हॅक्सीन उपलब्ध होणार, जाणून घ्या किंमत?

सरकारसोबत चर्चा करतेय कंपनी 

Updated: Jun 27, 2021, 09:03 AM IST
देशभरात सिंगल डोस व्हॅक्सीन उपलब्ध होणार, जाणून घ्या किंमत? title=

मुंबई : कोरोना व्हायरसविरोधात देशभरात मोहिम सुरू आहे. असं असताना पुढच्या महिन्यात आणखी एक व्हॅक्सीन मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील औषध कंपनी जॉनसन ऍण्ड जॉनसनची कोरोना प्रतिबंधात्मक लस जुलै महिन्यात भारतात मिळणार आहे. (Johnson & Johnson COVID-19 vaccine likely to be available in India by July - price and other details here)  सुरूवातीला कमी प्रमाणात ही लस उपलब्ध होणार आहे. महत्वाचं म्हणजे ही लस सिंगल लस व्हॅक्सीन आहे. 

सुत्रांच्या माहितीनुसार, असोसिएशन ऑफ हेल्थ केअर प्रोवाइडर्स अमेरिकेची कंपनीमधून सर्व व्हॅक्सीन उपलब्ध होणार आहे. एक डोस असलेल्या या व्हॅक्सीनची किंमत भारतात 25 डॉलर म्हणजे 1800 रुपयांत ही लस मिळणार आहे. 

भारता सारख्या देशात ही लस अनुकूल आहे. वायरल वेक्टर आधारित ही व्हॅक्सीन अतिशय फायदेशीर आहे. ही लस ठेवण्यासाठी कमी तापमानाचं रेफ्रिजरेटची आवश्यकता नाही. देशात आरोग्य सुविधांची परिस्थिती पाहता टियर 3 शहरात ही व्हॅक्सीन अतिशय जास्त उपयोगी असू शकते. 

सरकारसोबत चर्चा करतेय कंपनी 

जॉनसन ऍण्ड जॉनसन देशात याची निर्माण प्रक्रिया आणि विशिष्ट गोष्टी प्रमाणित करण्यासाठी सरकारशी बोलणार आहे. भारतात क्लिनिकल ट्रायल सुरू करण्याची गरज नाही. अमेरिकेचा असा दावा आहे की, मिळालेल्या परवानगीच्या आधारावर देशात अत्यावश्यक सेवा करण्यास परवानगी मिळाली आहे. 

66.3 टक्के प्रभावित आहे लस 

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसच्या हलक्या आणि मध्यम श्रेणी संक्रमणात जॉनसनची ही व्हॅक्सीन 66.3 टक्के उपयुक्त आहे. तर गंभीर ते अति गंभीर संक्रमणाविरोधात ही लस 76.3 टक्के प्रभावी आहे. ही लस घेतल्याच्या 28 दिवसांनंतर तुम्हाला कोरोनाची लागण झाली तरी रूग्णालयात दाखल होण्यची गरज नाही.