Job Stress: तुम्ही सुद्धा विकेंडची आतुरतेने वाट पाहता? हा Video पाहिल्यानंतर मिळेल उत्तर

नोकरी करणारा प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या चिंतेनं ग्रासलेला आहे. कामाचा लोड, बॉसचं प्रेशर आणि सुट्ट्या न मिळणं यामुळे नोकदार वर्ग पुरता वैतागून जातो. त्यामुळे आठवड्याची सुट्टी हाच एकमेव सुखाचा क्षण वाटत असतो. दर आठवड्याला नोकरदार वर्ग सुट्टीची आतुरतेने वाट पाहात असतो.

Updated: Nov 17, 2022, 03:57 PM IST
Job Stress: तुम्ही सुद्धा विकेंडची आतुरतेने वाट पाहता? हा Video पाहिल्यानंतर मिळेल उत्तर title=

Work Life Balance Sadguru Jaggi Vasudev Video: नोकरी करणारा प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या चिंतेनं ग्रासलेला आहे. कामाचा लोड, बॉसचं प्रेशर आणि सुट्ट्या न मिळणं यामुळे नोकदार वर्ग पुरता वैतागून जातो. त्यामुळे आठवड्याची सुट्टी हाच एकमेव सुखाचा क्षण वाटत असतो. दर आठवड्याला नोकरदार वर्ग सुट्टीची आतुरतेने वाट पाहात असतो. या तणावातून सुटका व्हावी यासाठी विकेंडला प्लान आखले जातात, त्यात रमून जातो. दोन दिवस आरामात घरी बसून तणावमुक्त व्हावं अशी इच्छा असते. असं फक्त भारतातल्याच नाही, तर जगभरातील नोकरदार वर्गासोबत होतं. असं असताना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कू अॅपवर सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. कु अॅपवर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे विकेंडची आतुरतेने वाट का पाहता? याचं उत्तर मिळेल. 

सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी काय सांगितलं?

सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी सांगितलं आहे की, काही वर्षांपूर्वी माझ्या अमेरिकेतील एक मित्र एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला होता. त्या रेस्टॉरंटचे नाव TGIF होते. सद्गुरूंनी त्यांच्या मित्राला विचारले TGIF म्हणजे काय? तेव्हा त्यांच्या मित्राने उत्तर दिले की याचा अर्थ 'थँक गॉड, इट्स फ्रायडे' (Thank God It's Friday). यानंतर त्यांच्या मित्राने सांगितले की, शुक्रवारची दुपार म्हणजे लोकांनी काम करणे जवळजवळ बंद केले आहे आणि आता आगामी पार्टीचा विचार करत आहेत.

या उत्तरानंतर सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी सांगितलं की, 'याचा अर्थ असा आहे की ते लोक आता दर आठवड्याला फक्त वीकेंडसाठी जगत आहेत. आठवडाभर कामाच्या ओझ्याने त्रस्त असलेली व्यक्ती वीकेंडची वाट पाहत असते. असे का? तुम्ही जे करत आहात ते तुमचे जीवन नसेल तर ते करू नका. जेव्हा आपण जन्म घेतो तिथपासून मरेपर्यंत आपण फक्त जीवन जगत असतो. काम मरणासारखे नसावे.'