आणखी एक श्रद्धा हत्याकांड! होळीचा दिवस डॉक्टर सुमेधासाठी ठरला अखेरचा, प्रियकर जौहरने घेतला जीव

दिल्लीतील श्रद्धाव वालकर हत्याकांडाचा निकाल अद्याप लागला नसतानाच अशीच एक घटना समोर आली आहे. प्रियकराने उच्चशिक्षित प्रेयसीवर चाकूने वार करत हत्या केली, नंतर स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Updated: Mar 10, 2023, 03:27 PM IST
आणखी एक श्रद्धा हत्याकांड! होळीचा दिवस डॉक्टर सुमेधासाठी ठरला अखेरचा, प्रियकर जौहरने घेतला जीव title=

Crime News : देशात श्रद्धा वालकर हत्याकांडासारखी (Shraddha Murder Case) आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला डॉक्टरची तिच्या प्रियकराने चाकूने वार करत हत्या केली. प्रेयसीची हत्या केल्यानेतर प्रियकराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलसांनी धाव घेत जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केलं. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हत्येची घटना जम्मू-काश्मिरमध्ये (Jammu Kashmir) घडली असून डॉ सुमेधा शर्मा (Dr Sumedha Sharma) असं मृत तरुणीचं नाव आहे. जम्मूतल्या तालाब तिल्लो भागात ती राहात होती. तर आरोपी डोडा जिल्ह्यातील भद्रवाह इथला राहाणार असून त्याचं नाव जौहर महमूद गनई (Jauhar Mehmood Ganai) असं आहे. आरोपी जौहर गनईने आपल्या फेसबूक पोस्टवर (Facebook Post) वैयक्तिक कारणाने आपण जीवन संपवत असल्याची पोस्ट लिहिली होती. याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली.

माहिती मिळताच पोलीस जौहर राहत असलेल्या ठिकाणी पोहोचली. घर आतून बंद असल्याने पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरात डॉक्टर सुमेधाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, तर जौहरच्या पोटावर गंभीर जखमी झाल्या होत्या. पोलिसांनी दोघांनाही तात्काळ रुग्णलयात दाखल केलं. पण डॉ. सुमेधाचा उपचाराआधीच मृत्यू झाला होता. तर जौहरची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी आरोपी जौहरवर 302 कलमातंर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. 

सुमेधा आणि जौहरची कॉलेज ओळख
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. सुमेधा शर्मा आणि आरोपी जौहर यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघंही जम्मूतल्या डेंटल कॉलेजमध्ये शिकत होते. कॉलेजमध्येच यादोघांची मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर सुमेधा शर्मा जम्मू-काश्मीरपासून काही अंतरावर असलेल्या एका कॉलेमधून एमडीएसचं शिक्षण घेत होती. 

होळीनिमित्ताने सुमेधा घरी आली होती
होळीच्या सुट्टीनिमित्ताने डॉ. सुमेधा जम्मूतल्या आपल्या घरी आली होती. 7 मार्चाल ती जौहरला भेटायला त्याच्या घरी आली होती. यावेळी दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरुन जोरदार भांडण झालं. भांडण इतकं टोकाला गेलं की जौहरने किचनमधला चाकून आणून सुमेधावर हल्ला केला आणि नंतर स्वत:वरही वार केले. यात अति रक्तस्त्रावामुळे सुमेधाचा जागीच मृत्यू झाला. दोघांमध्ये नेमक्या कोणत्या कारणावरुन भांडण झालं याचा तपास पोलीस करत आहेत. 

श्रद्धा वालकर हत्याकांड
गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये दिल्लीत श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) या तरुणीची हत्या झाली होती. याप्रकरणी तिचा प्रियकर आफताब पुनावाला (Aftab Poonawala) याला पोलिसांनी अटक केली. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि ते फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर अनेक दिवस तो मृतदेहाचे तुकडे दिल्लीतल्या मेहरौलीच्या जंगलात फेकून दिले.