नवी दिल्ली: रिलायन्स जिओकडून आपल्या मोबाईल कॉल आणि इंटरनेट सेवेच्या दरात मोठी वाढ करण्यात येणार आहे. येत्या ६ तारखेपासून जिओकडून नव्या प्लॅन्सची अंमलबजावणी होणार आहे. त्यानुसार मोबाईल कॉल आणि इंटरनेट सेवा पूर्वीपेक्षा ४० टक्क्यांनी महागणार आहे. या निर्णयामुळे जिओचा फायदा ३०० टक्क्यांनी वाढणार आहे. ६ डिसेंबरपासून सुरु जिओकडून ऑल इन वन प्लॅनची अंमलबजावणी होईल. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड मोबाईल कॉल आणि डेटा सुविधा मिळेल.
तर दुसरीकडे वोडाफोन-आयडियाने आपल्या नवीन प्रीपेड प्लानचे दर वाढवले आहेत. या नव्या प्लान अंतर्गत व्हाईस कॉल आणि डेटाचे दर महागणार आहेत. येत्या ३ डिसेंबरपासून ग्राहकांना नवीन दरानुसार पैसे मोजावे लागतील.
यापैकी २९९ आणि ३९९ रुपयांचे पॅक ३ डिसेंबरपासून उपलब्ध होणार आहेत. २९९ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल, २ जीबी डेटा दररोज, १०० एसएमएस आणि २८ दिवसांची वैधता मिळणार आहे. तर ३९९ रुपयांच्या पॅकमध्ये अनलिमिटेड कॉल, ३ जीबी डेटा, १०० एसएमएस आणि २८ दिवसांची वैधता असेल. ३७९ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल, ६ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधा मिळेल. ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, १.५ जीबी डेटा दररोजसह १०० एसएमएस मिळणार आहे. तर ६९९ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल, २ जीबी डेटा दररोज आमि १०० एसएमएस मिळणार आहे.