जम्मू-काश्मीरमध्ये जवान शहीद, CRPF सहकाऱ्यांनी बहिणीचे लावून दिले लग्न; पाहा भावनिक व्हिडिओ

काश्मीरमध्ये (Kashmir) एक जवान शहीद झाला. मात्र, लष्करातील अन्य साथीदारांनी एक मोठी जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडली.

Updated: Dec 15, 2021, 09:26 AM IST
जम्मू-काश्मीरमध्ये जवान शहीद, CRPF सहकाऱ्यांनी बहिणीचे लावून दिले लग्न; पाहा भावनिक व्हिडिओ   title=

मुंबई : काश्मीरमधील (Kashmir) अतिरेकीग्रस्त पुलवामा जिल्ह्यातील लेथपुरा येथे सीआरपीएफच्या (CRPF) 110 बटालियनमध्ये तैनात असताना शिपाई शैलेंद्र प्रताप सिंह यांनी 5 ऑक्टोबर 2020 रोजी दहशतवाद्यांविरुद्ध कमांड हाती घेतली. त्यावेळी त्यांनी देशासाठी आपले सर्वोच्च बलिदान दिले. जवान शैलेंद्र यांनी स्वतःचे बलिदान दिले आणि ते शहीद झालेत. पण त्यांचे लष्करातील अन्य साथीदारांनी एक मोठी जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडली.

'लग्नात एका भावाऐवजी अनेक भाऊ'

खरेतर, रायबरेलीचे (Raebareli) अमर सुपुत्र शहीद शैलेंद्र प्रताप सिंह (Martyr Shailendra Pratap Singh) यांची बहीण ज्योती यांचा विवाह सोहळा  (Sister’s wedding)13 डिसेंबर 2021 रोजी त्यांच्या रायबरेली येथील घरी झाला. विवाह सोहळ्यात उपस्थित प्रत्येकासाठी एक क्षण असाच भावनिक ठरला. जेव्हा सीआरपीएफचे जवान आणि अधिकारी शहीद जवानाच्या बहिणीच्या लग्नात पोहोचून विधीमध्ये सहभागी झाले होते. सर्वांनी बहिणीला सख्ख्या भावाप्रमाणे आशीर्वाद दिले.

तुम्ही हा भावनिक व्हिडिओ पाहा

सीआरपीएफ जवानांनी बहिणीसाठी भेटवस्तू दिली आणि बहिणीला फुलांची चादर देऊन लग्नाच्या मंचावर नेले आणि बहिण ज्योतीला शुभेच्छा दिला.

'हे फक्त भारतातच होऊ शकते'

या सीआरपीएफ (CRPF) जवानांनी आपल्या स्तरावर चांगला पुढाकार घेऊन भावाची भूमिका बजावली. सर्वांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते, दु:खाचे कारण शहीद शैलेंद्र यांची अनुपस्थिती जाणवत होती. मात्र, या सीआरपीएफ जवानांमुळे आनंद द्विगुणिक झाला होता. जवानांच्या भावाच्या भूमिकेने शहीद शैलेंद्र यांची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न झाला. शहीद शैलेंद्र यांचे वडील म्हणाले, 'माझा मुलगा आता या जगात नसला तरी प्रत्येक सुख-दु:खात नेहमी पाठीशी उभे राहणारे सीआरपीएफ जवानांच्या रूपाने मला एक नाही तर अनेक मुलगे मिळाले आहेत. आणि हे भारतात होऊ शकते, असे ते म्हणाले.