जनता कर्फ्यू : कोरोनाच्या विरोधात देशभरात लढाई सुरु

कोरोनाच्या विरोधात भारतीयांची लढाई जनता कर्फ्यू

Updated: Mar 22, 2020, 09:03 AM IST
जनता कर्फ्यू : कोरोनाच्या विरोधात देशभरात लढाई सुरु title=

नवी दिल्ली : जगभरातील 186 देशांमध्य कोरोना व्हायरस पोहोचल्यानंतर सगळ्याच देशांच्या चिंता वाढल्या आहेत. याचा परिणाम आता भारतावरही पाहायला मिळत आहे. देशातील परिस्थिती आणखी बिघडू नये म्हणून पंतप्रधान मोदींनी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. रविवारी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत जनतेने घरातच राहण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे. ज्यामुळे हा व्हायरस आणखी पसरणार नाही. या अभियानात सहभागी होऊन स्वत:ला आणि दुसऱ्याला ही सुरक्षित ठेवायचं आहे.

दिल्ली, मुंबई, कोलकाता, नोएडा, लखनऊ, बंगळुरु सारख्या मोठ्या शहरात लॉक डाऊन सारखी स्थिती आहे. अनेक ठिकाणं बंद ठेवण्यात आली आहेत. गर्दीच्या ठिकाणांवर बंदी घालण्यात आली आहे. बस सेवा, टॅक्सी सेवा आणि रेल्वे देखील बंद राहणार आहे. हरियाणा आणि राजस्थानमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे.

कोरोनाच्या विरोधात हे युद्ध जिंकण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. यामुळे लोकांनी आजच्या दिवशी घरातच राहणं गरजेचं आहे. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर देशभरातून याला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. लोकांनी स्वत: या बाबत जनजागृती करण्यास सुरवात केली होती.

नागपूरमधील सकाळची दृष्य

कर्नाटकमधील नेहमी वर्दळीचं बस स्थानक

केरळच्या त्रिवेंद्रम येथील दृष्य

हैदराबादमधील रस्त्यांवर देखील शांतता पाहायला मिळते आहे.