श्रीनगर : जम्मू काश्मिरमधील शोपियान जिल्ह्यात अतिरेक्यांच्या हल्ल्यात एक पोलीस शहीद झालेत. शोपियानं इथं पोलीस ठाण्यावर अतिरेक्यांनी पहाटे ग्रेनेडनं हल्ला केला त्याचबरोबर अंदाधुंदी गोळीबार केला. या गोळीबारात शाकिब मीर हे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांना मृत शहीद करण्यात आलं. पोलीस ठाण्यावर हल्ला केल्यानंतर अतिरेकी जवळच्या जंगलात पळून गेले. यामुळे या परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून शोध मोहीम सुरु आहे.
#jammukashmir: Terrorists attack police station in Shopian, one policeman injured.More details awaited
— ANI (@ANI) September 30, 2018
या हल्ल्यानंतर पोलीस व केंद्रीय राखील सुरक्षा दलाच्या जवानांनी शोध मोहीम सुरू केली आहे. सर्जिकल स्ट्राईकला दोन वर्ष पूर्ण होत असतानाच दहशतवाद्यांनी पुन्हा आगळीक केली आहे. दक्षिण काश्मीरमधील दहशतवाद प्रभावित शोपियान जिल्ह्यात रविवारी सकाळी दहशतवाद्यांनी एका पोलिस ठाण्याला लक्ष्य केले. या हल्ल्यात एक पोलीस शहीद झाला. तर हल्ला करून दहशतवादी फरार झाले आहेत.
दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांना घरोघरी छापेमारी सुरू केली आहे. दहशतवाद्यांनी पोलिस ठाण्याला चारी बाजुंनी वेढा टाकून अंदाधूंद गोळीबार केला. त्यानंतर शहीद जवानाची रायफल घेऊन दहशतवादी पसार झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एफआयआर दाखल करण्याचा बहाणा करून दहशतवाद्यांनी पोलीस ठाण्यात घुसखोरी केली. दरम्यान, शोपियानमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवादी सक्रीय आहेत. यापूर्वीही शोपिएनमध्ये अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत.