जवान-दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक, चिमुरड्यांसह एकूण 60 जीव वाचवण्यात यश

कडक सॅल्युट! गोळीबार सुरू असताना जवानांनी जीव धोक्यात घालून वाचवले लोकांचे प्राण

Updated: Nov 20, 2021, 07:04 PM IST
जवान-दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक, चिमुरड्यांसह एकूण 60 जीव वाचवण्यात यश title=

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाम परिसरात चकमक सुरू आहे. या चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला मोठं यश आलं आहे. कुलगाम पोलीस आणि सुरक्षा दलाने चकमक सुरू असलेल्या ठिकाणहून 60 लोकांसह शाळकरी मुलांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे. 

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा दलाने हिजबुल निजामुद्दीनच्या कमांडरसह दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली. तर चकमक सुरू असलेल्या परिसरातून मुलांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं.

कुलगाम जिल्ह्यातील आशमुजी परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. तिथे लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. सध्या कुलगाम परिसरात सुरक्षा दलाकडून कारवाई सुरू आहे.