अनंतनाग : काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे झालेल्या चकमकीत सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. राष्ट्रीय रायफल्स आणि लष्कराचे जवान चकमकीच्या वेळी बिजबेहरा गावातील सेकीपोरा भागात शोध मोहीम राबवत असताना ही चकमक झाली. रात्री उशिरा गस्त घालत असताना, दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात सहा दहशतवादी ठार झाले आहेत.
शुक्रवारी सकाळी सुरक्षा दलाला या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं. या अभियानात दहशतवाद्यांकडून फायरिंग झाल्यानंतर सुरक्षा दलानं त्याला योग्य ते प्रत्यूत्तर दिलं. पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घातलाय.
यापूर्वी २० नोव्हेंबर रोजी जम्मू-कश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत झालेल्या गोळीबारात हिजबुल मुजाहिद्दीनचे चार दहशतवादी ठार झाले होते तर सेनेचा एक दहशतवादीही शहीद झाला होता. या चकमकीत इतर दोन जवानही जखमी झाले होते.