दुर्गा विसर्जन दरम्यान मोठी दुर्घटना; अचानक आलेल्या पुरात 7 जण बुडाले, 30-40 लोक बेपत्ता

Jalpaiguri Mal River Flash Flood: दुर्गा विसर्जन दरम्यान मोठी दुर्घटना घडली. जलपायगुडी येथील माल नदीत विसर्जनादरम्यान अचानक आलेल्या पुरामुळे 7 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक अद्यापही बेपत्ता आहेत.  

Updated: Oct 6, 2022, 12:40 PM IST
दुर्गा विसर्जन दरम्यान मोठी दुर्घटना; अचानक आलेल्या पुरात 7 जण बुडाले,  30-40 लोक  बेपत्ता  title=

Jalpaiguri Mal River Flash Flood:पश्चिम बंगालमध्ये दुर्गा विसर्जन दरम्यान मोठी दुर्घटना घडली. जलपायगुडी येथील माल नदीत विसर्जनादरम्यान अचानक आलेल्या पुरामुळे 7 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक अद्यापही बेपत्ता आहेत. याशिवाय अनेक जण अजूनही नदीत अडकले आहेत. एनडीआरएफची टीम रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरु होतं. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये. 30-40 लोक अजूनही बेपत्ता आहेत. 

दुर्गा विसर्जनाच्यावेळी माल नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने जोरदार प्रवाहात अनेक लोक वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच एकच घबराट झाली. पाण्यात वाहून गेलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी उपस्थित लोकांनी आरडाओरडा सुरु केला. अपघातानंतर लगेचच जिल्हा प्रशासनाने विसर्जनाचा कार्यक्रम थांबवला. त्यानंतर लोकांना वाचवण्यास सुरुवात केली. या अपघातात 7 जणांचे मृतदेह सापडले असून 10 जखमींना वाचवण्यात यश आले आहे.

जलपाईगुडीतील माल नदीला अचानक पूर 

मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास 9 दिवस दुर्गा मातेची पूजा केल्यानंतर बुधवारी जलपाईगुडीमध्ये विजयादशमी उत्सव साजरा केला जात होता. दुर्गा मातेची मूर्ती विसर्जनासाठी माल नदीच्या काठावर नेल्या जात होत्या. ही नदी भूतानमधून वाहत भारतात येते. कार्यक्रमात सहभागी असलेले लोक खूप जल्लोष करण्यात दंग होते. महिला एकमेकांना सिंदूर लावून दुर्गादेवीला निरोपाचे गीत गात होत्या. तिथे मुलं एकत्र खेळ खेळत होती. यानंतर सायंकाळी विधिवत विसर्जनासाठी दुर्गा मातेची मूर्ती नदीत नेण्याचे काम सुरू झाले. यावेळी अचानक पुराच्या पाण्यात मोठी वाढ झाली.

पाण्याच्या जोरदार प्रवाहात लोक वाहून गेले 

दुर्गा विसर्जनावेळी नदीत पाणी कमी होते. त्यामुळे अनेक लोक दुर्गा विसर्जन नीट करण्यासाठी नदीच्या मध्यभागी गेले. यावेळी अनेक महिला आणि पुरुषांनी नदीच्या पाण्यात उभे राहून माता दुर्गाला निरोप दिला. अचानक नदीतील पाण्याची पातळी आणि वेग वाढला. लोकांना काही समजण्याच्याआधीच पाण्याच्या प्रवाह  प्रचंड वेगाने आला. पाण्याचा वेग इतका होता की किनाऱ्यावर उभे असलेले लोकही त्यांना वाचवण्यासाठी काहीच करू शकले नाहीत. 

नदीचे उग्र रूप पाहून अनेकांना धक्का

पाण्यात वाहून गेलेले लोक जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करत होते, मात्र नदीच्या भीषण रुपासमोर नदीत उतरण्याचे धाडस कोणीच करत नव्हते. त्यामुळे अनेक महिला आणि पुरुष जोरदार पाण्यात वाहून गेले. अपघात होताच घटनास्थळी एकच आरडाओरडा झाला. घटनेनंतर लगेचच जिल्हा प्रशासनाने विसर्जनाचा कार्यक्रम थांबवून बचावकार्य सुरू केले. या घटनेचे हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.