Tax: पुढच्या 20 दिवसांत करा हे सरकारी काम, अन्याथा भरावा लागेल 5000 रुपये दंड

ITR: इनकम टॅक्स रिटर्न संदर्भात हे काम आहे. ज्या लोकांचे उत्पन्न आयकर स्लॅबपेक्षा जास्त आहे, त्यांनी आयटीआर भरणे आवश्यक असते. आर्थिक वर्ष 2022-23 साठी 31 जुलै 2023 पर्यंत आयकर रिटर्न भरता येणार आहे. अन्यथा तुम्हाला दंड भरुन हे काम करावे लागू शकते. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 12, 2023, 03:24 PM IST
Tax: पुढच्या 20 दिवसांत करा हे सरकारी काम, अन्याथा भरावा लागेल 5000 रुपये दंड  title=

ITR: अशी काही सरकारी कामे आहेत, जी वेळेत केली नाहीत तर आपल्याला दंड भरावा लागतो. असेच एक काम आता तुम्हाला करावे लागणार आहे. अन्यथा तुम्हाला 5 हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. इनकम टॅक्स रिटर्न संदर्भात हे काम आहे. ज्या लोकांचे उत्पन्न आयकर स्लॅबपेक्षा जास्त आहे, त्यांनी आयटीआर भरणे आवश्यक असते. आर्थिक वर्ष 2022-23 साठी 31 जुलै 2023 पर्यंत आयकर रिटर्न भरता येणार आहे. अन्यथा तुम्हाला दंड भरुन हे काम करावे लागू शकते. 

आयकर रिटर्न

इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) हे दस्तऐवज आहे जे प्रत्येक करदात्याला आयकर विभागाकडे दाखल करावे लागते. मागील वर्षात कमावलेले उत्पन्न घोषित करण्यासाठी दरवर्षी ही प्रक्रिया केली जाते. 

वर्षातून एकदा प्राप्तिकर विवरणपत्र सादर केले जाते. आयटीआर फॉर्म, ज्याला फॉर्म 16 देखील म्हणतात.

आयकर

31 जुलै ही इन्कम टॅक्स (ITR) भरण्याची शेवटची तारीख आहे. यासाठी सरकार अनेकदा मुदत वाढवून देत असते, मात्र यावेळी अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे वैयक्तिक करदात्यांना त्यांचा ITR भरण्यासाठी फक्त 20 दिवसांचा अवधी आहे. करदाते 31 मार्च रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्ष 2022-23 आणि मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी त्यांचा ITR दाखल करु शकतात.

वेळेवर ITR भरणे हे भारताचे एक जबाबदार नागरिक म्हणून, प्रत्येक करदात्याचे कर्तव्य आहे. असे न केल्यास दंड भरावा लागतो. भविष्यात तुम्ही घर, गाडीसाठी कर्ज घ्यायला जाता तेव्हा आयटीआरची गरज लागते. तुम्ही नियमित आयटीआर भरला असेल तर कर्ज मिळण्यात काही अडचण येत नाही. त्यामुळे दंडाच्या भीतीने देखील काहीजण आयटीआर भरत असतात.

आता दिलेली मुदत निघून गेल्यावर आयटीआर भरायला गेलात तर दंड भरावा लागेल. आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत चुकल्यास प्रत्येकाला कलम 234 अंतर्गत आयटीआर दाखल करावा लागतो. परंतु कलम 139 अंतर्गत तुम्ही आयटीआर दाखल न केल्यास तुमच्याकडून कोणतेही विलंब शुल्क आकारले जाणार नाही.

आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, कलम 139(1) अंतर्गत वेळेच्या मर्यादेत ITR दाखल न केल्यास कलम 234F अंतर्गत दंड म्हणून 5,000 रुपये विलंब शुल्क भरावे लागेल. मात्र, जर एखाद्याचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल, तर त्यांना त्याच परिस्थितीत 1000 रुपये दंड भरावा लागेल.

आयटीआर कलम 139(1) अंतर्गत देय तारखेला किंवा त्यापूर्वी दाखल केला नाही तर, तो विलंबित रिटर्न मानला जातो. नियमांनुसार, विलंबित ITR कलम 139(4) अंतर्गत दाखल केला जातो, असे ITR नियम सांगतो.