मुंबई : जर तुमचे एकूण उत्पन्न (2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त) करपात्र असेल, तर तुम्हाला ITR भरावा लागेल. किती उत्पन्नावर तुम्हाला किती कर भरावा लागेल, ते तुमच्या वयावर आणि ह्यावर अवलंबून असते.
खालीलपैकी कोणत्याही करदात्यांनी त्यांचा आयटीआर फक्त ई-फायलिंगद्वारे भरणे अनिवार्य आहे. 5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्ती किंवा HUF (हिंदू अविभक्त कुटुंब) किंवा कर परताव्याचा क्लेम करणार्यांना ITR ऑनलाइन भरावा लागेल. ज्येष्ठ नागरिक (80 किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्ती) आयटीआर 1 किंवा 4 फाइल करण्यासाठी मॅन्युअली किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आयटीआर फाइल करण्याचा पर्याय निवडू शकतात.