यादवांच्या मुंबईतील संपत्तीवर आयकर विभागाच्या धाडी

राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याचं दिसतंय. 

Updated: Jun 2, 2017, 09:40 AM IST
यादवांच्या मुंबईतील संपत्तीवर आयकर विभागाच्या धाडी  title=

नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याचं दिसतंय. 

उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबियांच्या कथित संपत्तीवर आयकर विभागानं मुंबईत छापे मारलेत. यापूर्वी दिल्लीतही लालूंच्या २२ ठिकाणांवर छापे मारले गेले होते. 

या छाप्यांदरम्यान १००० करोड रुपयांची बेनामी संपत्ती जप्त करण्यात आली होती. बिहारचे भाजप नेते सुशील मोदी यांनी लालूंवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले होते. नुकताच त्यांनी बिहार विधानसभा आणि विधान मंडळ सदस्य सहकारी गृह निर्माण समितीचे जवळपास पाच प्लॉट अजूनही लालूंच्या ताब्यात असल्याचा आरोप केला होता. 

भारत पेट्रोलियमकडूनही बिहारचे आरोग्यमंत्री आणि लालूंचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांना १५ दिवसांची कारणे दाखवा नोटीस धाडलीय. पाटणा बायपासजवळ भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपची डीलरशिप 'लारा ऑटोमोबाईल्स' नावानं तेज प्रताप यांच्या नावावर आहे. भारत पेट्रोलियमच्या नियमांनुसार, डीलरशिप केवळ त्याच लोकांना दिली जाते जे बेरोजगार आहेत किंवा ज्यांच्याकडे मिळकतीचं दुसरं कोणतंही साधन नाही.