IT कंपन्या संकटात, लाखभर नोकरकपात... आयटी कंपन्या कोणत्या संकटात ?

IT कंपन्यांवर नोकरकपातीचं संकट का आलं? येत्या काळात आयटी कंपन्यांसाठी आणखी वाईट दिवस येऊ शकतात  

Updated: Nov 24, 2022, 07:21 PM IST
IT कंपन्या संकटात, लाखभर नोकरकपात... आयटी कंपन्या कोणत्या संकटात ? title=
संग्रहित फोटो

IT Company Recession : जगभरातल्या आयटी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन (Recession) काढतायत. गेल्या काही दिवसांत लाखो कर्मचारी बेरोजगार झालेत. Twitter, Facebook, Amazon, Microsoft अशा मोठ्या कंपन्यांनंतर आता HP या आयटी कंपनीही 6 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. अर्थात इतर कंपन्यांप्रमाणे एका फटक्यात या कर्मचाऱ्यांना काढून टाकलं जाणार नाहीये तर पुढच्या 2 वर्षात टप्प्याटप्प्यानं कर्मचारी कपात केली जाईल. अचानक आयटी कंपन्यांनी (IT Company) कपात करायला का सुरुवात केलीय याची कारणंही समोर आलीयेत.

नोकरकपातीची कारणं 
कोरोनानंतर ITकंपन्यांना जाहिरातीतून मिळणारं उत्पन्न घटलं आहे, जाहिरातदार ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर कमी खर्च करतायत, त्यातच जागतिक मंदीचा सर्वाधिक फटका आयटी सेक्टरला बसलाय. शिवाय नव्या योजना लाँच करण्यासाठी आर्थिक भांडवलाची गरजही भासतेय. आतापर्यंत मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नोकरकपात करण्यात आली आहे. एका अहवालानुसार येत्या काळात आयटी कंपन्यांसाठी आणखी वाईट दिवस येऊ शकतात.

आठवड्याभरात लाखो नोकऱ्या गेल्या
HPकडून 6 हजार कर्मचा-यांना नारळ

सिस्कोमधून 4 हजार 100 कर्मचा-यांची कपात

ट्विटरनं  3 हजार 700 कर्मचा-यांना कामावरुन काढलं

सीगेटमधून 3000 जणांच्या नोक-या गेल्या

मायक्रोसॉफ्टमधून 1000 कर्मचा-यांना काढलं

स्नॅप चॅटमधून 20 % कर्मचारी कपात

ई-कॉमर्स स्टार्टअप उडानमधून 350 नोक-या गेल्या

इंटेलमध्येही मोठ्या प्रमाणात नोकर कपातीचं संकट

बायजूस, अनअकॅडमी, वेदांतू, व्हाईटहॅट ज्युनियर, ओला कंपन्यांकडून मोठी कपात

एका आठवड्यात मोठमोठ्या कंपन्यांनी लाखो कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं आहे. भविष्यात या लिस्टमध्ये आणखी काही कंपन्यांची नावं जोडली जाऊ शकतात. 

आयटी सेक्टरसाठी वाईट काळ
कोरोना काळात आयटी क्षेत्र सर्वात सुरक्षित मानलं जात होतं. वर्क फ्रॉम होमची सुरुवातही आयटी सेक्टरपासूनच झाली. पण आता वेळ बदललीय आणि काळही. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ही तर फक्त सुरुवात आहे.. याहून वाईट काळ आयटी सेक्टरसाठी येऊ शकतो, ज्यात लाखो नोकऱ्या जातील. त्यामुळे कर्मचाऱ्यांनो तुमची नोकरी सांभाळा..