अवकाशातून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी असा दिसत होता भारत...

दिवाळी हा दिव्यांचा सण.. या दिवशी भारतात सर्वत्र रोषणाई केली जाते.

Updated: Oct 22, 2017, 01:35 PM IST
अवकाशातून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी असा दिसत होता भारत...  title=

मुंबई : दिवाळी हा दिव्यांचा सण.. या दिवशी भारतात सर्वत्र रोषणाई केली जाते.

मोठ्या प्रमाणात चार दिवस रोषणाई केल्यानंतर भारत देश अवकाशातून कसा दिसत असेल असा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावतो.. अनेक वर्ष या उत्सुकतच्या पोटी फोटोशॉप केलेला फोटो व्हायरल  होत होता.
यंदा मात्र तुम्हांला फोटोशॉप केलेला फोटो दाखवून मूर्ख बनवण्याआधी इटालियन अंतराळवीर पाऊलो नेसपोली(Paolo Nespoli)यांनी शेअर केलेला हा खास फोटो पहा... 

 

पाऊलो हे ६० वर्षीय अंतराळवीर आहे. त्यांनी लक्ष्मीपूजनच्या दिवशी अवकाशातून दिवाळीच्या दिवसात भारत कसा दिसतो याचा एक फोटो शेअर केला आहे. सोबतच भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

पाऊलो हे  युरोपियन स्पेस एजन्सीचे अंतराळवीर आहेत. सध्या ते 'विटा मिशन'   (Vita Mission)करिता अंतराळात महिनाभराच्या मिशनवर आहेत. या कामगिरीदरम्यान त्यांनी दिवाळीच्या दिवसातील हे खास दृश्य टिपले आहे.

पाऊलो यांनी ट्विटरवर फोटो शेअर करताच,या  फोटोवर ६००० हून अधिक लाईक्स तर ४००० हून अधिक लोकांनी रिट्विट्स केले आहेत.