IRCTC Ticket Booking Issue: रेल्वे तिकीट बुकिंगसाठी अनेकजण अनेक पर्याय वापरतात. पण, यामध्ये सर्वाधिक वापरात असणारं आणि लोकप्रिय माध्यम म्हणजेच IRCTC Ticket Booking App. शिवाय आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरूनही अनेकजण तिकीट बुकींग करण्याला प्राधान्य देतात. पण, आता मात्र काही तांत्रिक कारणांमुळं वेबसाईट आणि अॅपच्या माध्यमातून तिकीट बुकींगमध्ये येणाऱ्या अडचणींबद्दलची माहिती देण्यात आली आहे. तिकीटासाठीची रक्कम भरतेवेळी येणाऱ्या या अडचणींवर सध्या काम सुरु असून, लवकरात लवकर ही सेवा पूर्ववत करण्याकडे रेल्वे विभागाचा कल दिसून येत आहे.
Due to technical reasons the ticketing service is not available. Our technical team is resolving the issue. We will notify as soon as the technical issue is fixed.
— IRCTC (@IRCTCofficial) July 25, 2023
आयआरसीटीसीकडून प्रवाशांना तिकीट बुकींगदरम्यान रक्कम भरण्यासाठी E Wallet चा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शिवाय तिकीटांच्या बुकींगसाठी Ask Disha हा पर्याय निवडण्याची विचारणाही केली जात आहे. शिवाय तुम्ही रेल्वे स्थानकांवर थेट तिकीट खिडकी गाठूनही प्रवासासाठीचं तिकीट बुक करू शकता.
रेल्वे विभागाकडून कायमच वेळोवेळी प्रवाशंना केंद्रस्थानी ठेवत काही अशा सुविधा आणल्या जातात जिथं प्रवाशांच्या प्रवासाप्रमाणंच त्यांची तिकीट आरक्षण प्रक्रियाही सोपी होते. काही दिवसांपूर्वीच रेल्वे विभागाच्या वतीनं अशाच एका पर्यायाचा वापर केला गेला. जिथं प्रवाशांना एखाद्या स्थानकाचं अचूक नाव लक्षात नसेल, तरीही त्यांना तिकीट बुक करता येणार आहे. कारण, रेल्वे विभागाकडून प्रसिद्ध रेल्वे स्थानकाशी इतर संबंधिक स्थानकांची नावं जोडण्यात आली आहेत.
रेल्वे विभागाकडून देण्यात आलेल्या या नव्या सुविधेचा वापक हा पर्यटनाला वाव देण्यासाठी करता येणार आहे. जिथं अगदी सोप्या पद्धतीनं Confirm तिकीट मिळवता येणार आहे. इतकंच नव्हे तर, तुम्हाला अमुक एका ठिकाणी जायच असल्यास तिथं पर्याय म्हणून त्यानजीकची स्थानकं आणि जवळपासची ठिकाणंही तुम्हाला पर्याय म्हणून उपलब्ध करून देण्यात येतील.