आयत्या वेळी Reserved तिकीटावरील नाव बदलणं सहज शक्य, रेल्वेचा नवा नियम पाहिला?

Indian Railway : भारतीय रेल्वे प्रवाशांच्या गरजा आणि त्यांच्या सोयीसाठी सातत्यानं धोरणांमध्ये बदल करत असते. प्रवासासाठीचे नियमही सातत्यानं बदलत असते. अशाच एका बदलाला रेल्वे विभागानं आणखी सोईस्कर केलं आहे...   

Updated: May 18, 2023, 11:18 AM IST
आयत्या वेळी Reserved तिकीटावरील नाव बदलणं सहज शक्य, रेल्वेचा नवा नियम पाहिला?  title=
irctc northern indian railway rules for name change on reserved ticket

Indian Railway : भारतामध्ये दर दिवशी लाखोंच्या संख्येनं प्रवासी रेल्वेचा प्रवास करतात. स्थानिक असो किंवा मग आंतरदेशीय प्रवास असो, अनेक राज्यांच्या सीमा ओलांडून आणि कानाकोपऱ्यातील गावांना जोडून भारतीय रेल्वेचं हे जाळं आशिया खंडातील सर्वात मोछं Railway Network ठरलं आहे. अनेक वर्षांपासून प्रवाशांच्या सेवेत अविरतपणे नवनवीन सुविधा आणणाऱ्या या रेल्वे विभागाकडून आता पुन्हा एकदा काही नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

रेल्वेच्या या नियमानुसार आरक्षित रेल्वे तिकीटाच्या नियमावर अगदी सोप्या पद्धतीनं नाव बदलता येणार आहे. बरं ही प्रक्रिया याआधी अतिशय क्लिष्ट असल्यामुळं रेल्वे तिकीटावर नाव बदलणं म्हणजे डोकेदुखीच ठरत होती. पण, आता मात्र देशातील नॉर्थर्न रेल्वेकडून हे बदल करण्यात आले आहेत. यामुळे आता उत्तर रेल्वेच्या प्रत्येक स्थानकावर अधिकाऱ्यांना अर्ज घेणं, महत्त्वाच्या कागदपत्रांची पडताळणी करणं आणि रेल्वे तिकीटावर प्रवाशांचं नाव बदलण्याचे अधिकार असतील. 

कसा होईल फायदा? 

नव्यानं समोर आलेल्या या सुधारित नियमानुसार जर कोणीही प्रवासी रेल्वे निघण्याच्या 24 तासांच्या आत तिकीटावरील नाव बदलू इच्छितो, तर त्याला ही मुभा असेल. रेल्वेच्या तिकीटावर नाव बदलण्याची तरतूद यापूर्वीही प्रवाशांना देण्यात आली होती. पण, आता मात्र ती आणखी सोपी करण्यात आली आहे. सदर निर्णयानंतर रेल्वेकडून समाजातील प्रत्येक घटकाला अनुसरून सदरील निर्देश जारी करण्यात आले आहेत. 

हेसुद्धा पाहा : मै नही तो कौन बे? महाराष्ट्राची लेक गाजवतेय फ्रान्सचं Cannes 

रेल्वेकडून जारी करण्यात आलेल्या या नियमानुसार आता काही कारणास्तव ज्या प्रवाशाच्या नावे तिकीट आरक्षित करण्यात आली आहे, त्यांना प्रवास करणं अशक्य आहे, त्यांचं तिकीट रद्द करण्याऐवजी कोणा दुसऱ्या व्यक्तीला त्यांच्या जागी प्रवास करता येईल. इथं सहजपणे नावं बदलून तिकीटांचं हस्तांतरण करता येणार आहे. कुटुंबतील कोणीही सदस्य उदाहरणार्थ, आई, वडील, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, किंवा पती, पत्नीच्या नावे तिकीटाचं हस्तांतरण होऊ शकतं. प्रवाशांच्या विनंतीवरून यासंबधीची पुढील प्रक्रिया पार पडेल. 

तु्म्हीही काही कारणास्तव Northern Railway नं प्रवास करणार असाल आणि आयत्या वेळी प्रवास रद्द कण्याची वेळ आली, तर तुमच्या तिकीटावर शक्य असल्यास कोणा दुसऱ्या व्यक्तीला अगदी सहजपणे पाठवू शकता. आहे की नाही कमाल?