IRCTC Indian Railways : ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी असं मिळवा Confirm तिकिट, IRCTC कडून माहिती

आपल्याला कन्फर्म तिकिट कशी मिळणार? असा प्रश्न लोकांना सतावत असतो.

Updated: Sep 13, 2021, 08:06 PM IST
IRCTC Indian Railways : ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी असं मिळवा Confirm तिकिट, IRCTC कडून माहिती title=

मुंबई : सध्या सर्वत्र साणांचा सीजन सुरू आहे. त्यामुळे एकापाठोपाठ एक असे अनेक सणांची आता सुरूवात होणार आहे. आता गणपतीनंतर दिवाळी, दसरा अशा विविध सणांसाठी लोकं प्रवास करतात. त्याशिवाय काही पर्यटनासाठी देखील जातात. ज्यामुळे एका राज्यातुन दुसऱ्या राज्यात लोकं प्रवास करण्यासाठी ट्रेनचा वापर करतात. परंतु यामुळे होतं काय की, बहुतेकदा आपलं ट्रेनचं तिकिट कन्फर्म होत नाही. ज्यामुळे प्रवासासाठी यात्रींना दीर्घ प्रतीक्षा यादीसाठी थांबावे लागते.

अशा परिस्थीतीत आपल्याला कन्फर्म तिकिट कशी मिळणार? असा प्रश्न लोकांना सतावत असतो. परंतु आज आम्ही तुम्हाला असा एक मार्ग सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळण्यात मदत होईल.

अलीकडे, IRCTC ने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी विशेष सुविधेबद्दल सांगितले आहे. ही सुविधा आधीपासूनच दिली जात आहे, परंतु या संदर्भात रेल्वेने पुन्हा माहिती शेअर केली आहे. लोअर बर्थ बुक करण्याबाबत रेल्वेने म्हटले आहे की, माहितीच्या अभावामुळे अनेक वेळा लोक IRCTC द्वारे पुरवलेल्या या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

अनेक प्रवासी भारतीय रेल्वेने प्रवास करतात, त्यासाठी ते IRCTC द्वारे ऑनलाइन तिकिटे घेतात. परंतु भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी लोअर बर्थचे बुकिंग करण्याची तरतूद असूनही त्यांना लोअर बर्थ शोधता येत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी तिकीट कन्फर्म होऊ शकते.

कसं बुक करावं तिकिट?

सर्वप्रथम तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. येथे तुम्हाला प्रथम प्रवासाची तारीख निवडावी लागेल. त्यानंतर गंतव्यस्थानाचे नाव प्रविष्ट करा. यानंतर, त्या मार्गावरील सर्व गाड्यांची यादी तुमच्या समोर येईल. यानंतर, तुम्ही प्रवास करु इच्छिनाऱ्या ट्रेनची निवड करा आणि तळाशी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी लोअर बर्थ पर्यायाची निवड करा.

यानंतर, ज्येष्ठ नागरिकांसाठी गाड्यांमध्ये उपलब्ध आसनांची यादी दिसेल. येथे तुम्ही संबंधित व्यक्तीचे किंवा महिलेचे नाव भरा आणि सबमिट करा. यानंतर पेमेंट केल्यानंतर तिकीट कन्फर्म होईल.