INX Media Case : चिदंबरम यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी

  पी. चिदंबरम यांना न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावली आहे.  

ANI | Updated: Aug 22, 2019, 07:10 PM IST
INX Media Case : चिदंबरम यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी  title=

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना काल अटक करण्यात आली. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावली आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणासोबतच आणखी चार प्रकरणांत सक्तवसुली संचालनालयाने त्यांची चौकशी सुरू  केली आहे. तसेच सीबीआयने न्यायालयाकडे पाच दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य केली आहे.

पी चिदंबरम यांना सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची बाजू अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल यांनी चिदंबरम यांची बाजू मांडली. सीबीआयकडून पाच दिवसांची कोठडी मागण्यात आली होती. आता सीबीआय न्यायालयाने चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. त्यामुळे चिदंबरम यांना न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे.

अटक होण्याआधी काँग्रेस मुख्यालयात बुधवारी चिदंबरम यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपली बाजू मांडली.  मी फरारी आहे, न्यायप्रक्रिया टाळत आहे, असा अपप्रचार पद्धतशीरपणे केला गेला.  मी कायद्याचे पालन करणारा आहे आणि तपास यंत्रणांनीही कायद्याचे पालन करावे. माझ्याविरोधात एकही आरोपपत्र दाखल नाही, उलट एका प्रकरणात मला आधीच तपास यंत्रणेकडून निर्दोष जाहीर करण्यात आले आहे.