कॉलेज कपलचा Intimate Video व्हायरल लीक झाला अन् मग...

Intimate Video Viral : कॉलेजमधील प्रेम आणि त्यानंतर त्यांचा प्रायव्हेट क्षणाचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला अन् मग...एका क्षणात त्यांनी...

Updated: Jul 31, 2023, 12:50 PM IST
कॉलेज कपलचा Intimate Video व्हायरल लीक झाला अन् मग... title=
Intimate Video leaked viral on social media college students die karnataka trending news today

Intimate Video Viral : प्रेमात सगळं जग विसरायला होतं, हे खरं आहे. पण प्रेमात काळजी, आदर, जिव्हाळा आणि विश्वास असतो. पण प्रेमात काही मर्यादाही पाळायचा असतात. पण आजच्या तरुण पिढीला त्याचा विसर पडला आहे, हेच वारंवार दिसून येतं. त्यानंतर त्यांना ज्या भयानक प्रसंगाचा आणि समस्येचा सामना करावा लागतो हेच त्यांना आजही कळतं नाही. (Intimate Video leaked viral on social media college students die karnataka trending news today)

असाच एक प्रसंग कॉलेजमधील प्रेम करणाऱ्या कपलवर ओढवला. प्रेमात त्यांनी मर्यादा ओलांडली अगदी खासगी आणि प्रायव्हेट क्षणात प्रेम व्यक्त केला. पण हा व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला. त्यानंतरच्या जे भयानक गोष्टींना त्यांना सामना द्यायचा होता याचा विचार करुन या दोघांनी धक्कादायक निर्णय घेतला. 

कपलचा प्रायव्हेट क्षणाचा हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर ते दोघे घाबरले. आता काय होणार या भीतीने कॉलेजमधील या तरुण तरुणीने आपला जीव दिला. ही धक्कादायक घटना आहे, कर्नाटकातील दावणगेरेमधील असून ते दोघे द्वितीय वर्षामध्ये शिकतं होते. 

मिळालेल्या माहितीनुसार काही महिन्यांपूर्वी सरकारी महाविद्यालयाच्या टेरेसवर हे दोघे एकत्र होते. त्यावेळी ते एकमेकांच्या जवळ आले. तेव्हा अज्ञात व्यक्तीने त्यांचा नकळत त्यांचा आक्षेपार्ह अवस्थेतीतील व्हिडीओ काढला. एवढंच नाही तर तो सोशल मीडियावर शेअरही केला. हा संपूर्ण व्हिडीओ साधारण 3.21 मिनिटांचा आहे. शुक्रवारी हा व्हिडीओ इंटरनेवर पोस्ट करण्यात आला आणि तो काही सेकंदात व्हायरल झाला. 

दरम्यान या व्हिडीओसंदर्भात तरुण आणि तरुणीच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे स्वतंत्र तक्रारी दाखल केली असून त्या व्यक्तीला शिक्षा करण्याची मागणी केली आहे.